वन कायद्यात रखडला चेन्ना प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:52 AM2018-05-21T00:52:31+5:302018-05-21T00:52:31+5:30

मुलचेरा तालुक्यात मुकडी गावाजवळ चेन्ना नदीवर बांधण्यात येणारा चेन्ना हा मध्यम सिंचन प्रकल्प १९८४ पासून बंद पडला आहे. मुलचेरा तालुक्यातील सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींची कमालीची उदासीनता आजवर दिसून आली आहे.

Chenna project stuck in forest law | वन कायद्यात रखडला चेन्ना प्रकल्प

वन कायद्यात रखडला चेन्ना प्रकल्प

Next
ठळक मुद्देसिंचनाअभावी शेकडो शेतकरी अडचणीत : केंद्र व राज्य सरकार सुस्त, ३३ वर्षांपासून प्रकल्प थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यात मुकडी गावाजवळ चेन्ना नदीवर बांधण्यात येणारा चेन्ना हा मध्यम सिंचन प्रकल्प १९८४ पासून बंद पडला आहे. मुलचेरा तालुक्यातील सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींची कमालीची उदासीनता आजवर दिसून आली आहे.
दोन हजार ३४२ हेक्टर सिंचनक्षमता असलेल्या या प्रकल्पावर आॅक्टोबर २०१४ पर्यंत म्हणजे प्रकल्प बंद झाला त्यावेळी पर्यंत १४२.६४ लक्ष रूपये खर्च करण्यात आला. २००६ मध्ये वन कायदा पारीत झाला. त्यानंतर देशबंधूग्राम, भगवतनगर, विवेकानंदपूर, श्रीनगर या चार ग्रामसभांनी ठराव करून जिल्हाधिकाºयांना सादर केला. २९ जून २०१० ला जिल्हाधिकाºयांनी अभिप्रायासह सुधारित दराप्रमाणे लाभव्यय गुणोत्तर काढण्यासाठी ५ मार्च २०११ ला प्रस्ताव परत करण्यात आला. २२ मार्च २०११ ला उपवनसंरक्षक यांच्याकडून माहिती मागविण्यात आली. १५ एप्रिल २०११ ला उपवनसंरक्षक आलापल्ली यांनी वनक्षेत्राचे सीमांकन प्रस्तावित केले आहे. १३ जून २०११ ला सीमांकन पूर्वी करण्यात आल्याचे कळविले. २१ आॅगस्ट २०१३ ला मुख्य वनरसंरक्षक प्रादेशिक यांच्या कक्षात अधीक्षक अभियंता पाटबंधारे प्रकल्प चंद्रपूर यांची बैठक झाली. मुख्य वनसंरक्षकांनी सीमांकन करून दिलेले असल्यामुळे सीमांकनाची आवश्यकता नाही, असे निर्देश दिले. वनप्रस्तावासह केंद्र शासनाची अंतिम मान्यता प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यावेळी देण्यात आली होती. मात्र कार्यवाही शुन्य आहे.
वन जमिनीचा अडथळा
१९८० मध्ये वन कायदा अस्तित्वात आल्यामुळे प्रकल्पाची संपूर्ण कामे १९८४ पासून स्थगीत करण्यात आली. प्रकल्पाच्या कामास लागणारी वन जमीन हस्तांतरित न झाल्यामुळे प्रकल्पाच्या कामास पुन्हा सुरुवात करण्यात आलेली नाही. प्रदीर्घ कालावधीपासून हा सिंचन प्रकल्प प्रलंबित आहे.

Web Title: Chenna project stuck in forest law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण