सायकल दौड स्पर्धेत चामोर्शीचा चेतन वाढई प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 01:13 IST2016-01-24T01:13:16+5:302016-01-24T01:13:16+5:30
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी शिवसेना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने सायकल दौड स्पर्धा घेण्यात आली.

सायकल दौड स्पर्धेत चामोर्शीचा चेतन वाढई प्रथम
शिवसेनेतर्फे आयोजन : २८५ स्पर्धकांनी घेतला सहभाग
गडचिरोली : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी शिवसेना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने सायकल दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण २८५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत चामोर्शीचा चेतन वाढई याने प्रथम क्रमांक पटकाविला.
येथील चामोर्शी मार्गावरील शिवसेना कार्यालयात सर्व प्रथम शिवसेनेचे चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा प्रमुख अजय स्वामी यांच्या हस्ते शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अजय स्वामी यांच्या हस्ते सायकल दौड स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून सुरूवात करण्यात आली. शिवसेना कार्यालय चामोर्शी रोड गडचिरोली ते शिवणी अशी सायकल दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या चेतन वाढई याचा रोख पाच हजार रूपये व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला जि.प.च्या माजी बांधकाम सभापती छाया कुंभारे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, जि.प. सदस्य सुनंदा आतला, उपजिल्हा प्रमुख राजू कावडे, नंदू कुमरे, बजरंग दलाचे कार्यवाह विनय मडावी, ज्ञानेश्वर बगमारे, गजानन नैताम, वासुदेव बट्टे, शिवेसना तालुका प्रमुख तेजस नरड, घनशाम कोलते, चांगदास मसराम, संदीप दुधबळे, यादव लोहंबरे, शाम श्रीपदवार, सुनिल नक्षिणे, राहूल सोरते, योगेश कुळवे, धनंजय कुळवे, देवेंद्र मोगरकर, प्रेमदास आदे, प्रशांत सोरते, सोनू लाडे, प्रकाश सवासीया, संतोष चांदेकर, मिलिंद भानारकर, भूषण गावतुरे, विनोद चापळे, खुशाल भुरसे, निरंजन लोहंबरे, महेश झोडे, हरबा दाजगाये, नंदू चांबरे, मुखरू चौधरी, विशाल राऊत, नानाजी धानफोले, सुखदेव कुरूडकार, हिम्मत खरवडे, तिरूपती पदा, खुशाल साखरे, योगेश टेंभुर्णे, छत्रपती लाडे, पिंटू बाळेकरमकर, देविदास सोनटक्के, अमोल उंदीरवाडे, अशोक आवारी, चुडाराम वाघमारे, भास्कर रोहणकर आदीसह शिवसेना, युवासेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सायकल दौड स्पर्धेदरम्यान गडचिरोलीचे वाहतूक पोलीस, जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय पथक व गडचिरोली नगर पालिकेच्या रूग्णवाहिका पथकाने भूमिका बजाविली. (स्थानिक प्रतिनिधी)