आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश
By Admin | Updated: December 11, 2014 23:06 IST2014-12-11T23:06:29+5:302014-12-11T23:06:29+5:30
राज्याचे गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल सदस्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश
गडचिरोली : राज्याचे गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल सदस्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. तसेच आत्मसमर्पीतांकरीता शासनाने घर बांधण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या भुखंड पट्ट्याचे वितरणही करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राला भेट दिली.
गृह राज्यमंत्र्यांसमावेत आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, राज्याचे पोलीस महासंचालक संजिव दयाल, गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्र कदम, जिल्हाधिकारी रणजितकुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक राहूल श्रीरामे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील शहीद स्मारकाला मंत्री महोदयांनी पुष्पचक्र वाहिले. तसेच आत्मसमर्पीत नक्षलवादी गोपी याच्याशी मंत्र्यांनी चर्चा केली. शहीद परिवाराच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या व यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)