चामोर्शीत ३७ महिला उमेदवार मैदानात
By Admin | Updated: October 21, 2015 01:31 IST2015-10-21T01:31:39+5:302015-10-21T01:31:39+5:30
१ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असलेल्या चामोर्शी नगर पंचायत निवडणुकीत १७ प्रभागापैकी ९ प्रभाग हे महिलांसाठी राखीव आहे.

चामोर्शीत ३७ महिला उमेदवार मैदानात
नऊ प्रभाग राखीव : चार ते पाच ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता
चामोर्शी : १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असलेल्या चामोर्शी नगर पंचायत निवडणुकीत १७ प्रभागापैकी ९ प्रभाग हे महिलांसाठी राखीव आहे. ९ प्रभागात ३७ महिला उमेदवार निवडणूक लढत आहेत.
प्रभाग क्र. २ मधून काँग्रेस-भाजप अशी सरळ लढत होणार असून काँग्रेसच्या सुनीता संजय धोडरे यांचा सामना भाजपच्या अर्चना अविनाश कत्रोजवार यांच्याशी आहे. प्रभाग क्र. ४ मध्ये पाच महिला उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसच्या सविता तोमदेव पिपरे, भाजपच्या संगीता सुधाकर वासेकर, राकाँच्या प्रतिभा हर्षकुमार धोडरे, मंगला देवानंद वालदे, अरूणा हनुमंत डंबारे या अपक्ष म्हणून उभ्या आहेत. अरूण डंबारे यांना शिवसेनेचे समर्थन आहे. प्रभाग क्र. ७ मधून काँग्रेसकडून यशोधरा अरूण लाकडे, भाजपच्या लोमा गंगाधर लाकडे, राकाँकडून प्रज्ञा धीरज उराडे मैदानात आहेत. प्रभाग क्र. ९ मधून काँग्रेसकडून माजी सरपंच मालन मधुकर बोदलकर, भाजपकडून कविता दिलीप किरमे तर गीता सुरेश गद्दे यांच्यात लढत आहे. प्रभाग क्र. १० मध्ये काँग्रेस मंदा सुभाष सरपे, भाजपच्या ललिता लक्ष्मण बुरांडे, राकाँच्या मोहिनी मुरलीधर कोठारे, अनिता संतोष नैताम अपक्ष म्हणून मैदानात आहेत. प्रभाग क्र. १२ मध्ये काँग्रेसकडून जयश्री पंकज वायलालवार, भाजपच्या माधवी विनोद पेशट्टीवार, राकाँच्या रहिमुन्नीसा शेख बब्बू असून मेरूनिशा हासिम खान व रंजना रामभाऊ बंडावार या अपक्ष म्हणून लढत देत आहेत. प्रभाग क्र. १३ मध्ये भाजप व काँग्रेसच्या उमेदवारात सरळ लढत आहे. काँग्रेसकडून संगीता संजय कुनघाडकर, भाजपच्या रोशनी स्वप्नील वरघंटे अशी मोठी लढत अपेक्षित आहे. प्रभाग क्र. १५ मध्ये सर्वात जास्त म्हणजे सात महिला उमेदवार रिंगणात आहे. काँग्रेसकडून अर्चना राजेश ठाकूर, भाजपच्या छाया रविशंकर बोमनवार, राकाँच्या ज्योत्स्ना उमाकांत कावळे, शिवसेनेच्या मंजुषा निमाई रॉय याशिवाय अपक्ष म्हणून योगीता अमित साखरे, अल्का भाऊराव उपासे, शालू राजेश दुर्गे याही मैदानात आहेत.
प्रभाग क्र. १६ मधून काँग्रेसच्या प्रतीक्षा दादाजी काटकर, भाजपच्या मीनल मनोज पालारपवार, राकाँच्या मंजुषा देवानंद बोरकर रिंगणात असून अंजली अजय उरकुडे, किशोरी अयज येनुगवार, माधुरी कमलेश बर्लावार याही अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. महिलांसाठी असलेल्या ९ जागांकरिता काँग्रेस, भाजपने सर्व जागांवर उमेदवार उभे केले असून राकाँ ६ जागेवर तर शिवसेना १ जागेवर लढत आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश ठाकूर यांनी आपल्या पत्नी तर जि. प. चे माजी सभापती रवी बोमनवार यांनी आपल्या पत्नीला प्रभाग १५ मधून रिंगणात उतरविल्याने ही जागा प्रतिष्ठेची झाली आहे. त्यातच शिवसेनेच्या मंजुषा निमाई रॉय याही जबरदस्त लढत देण्यासाठी तयारीत आहे. येथे सर्वाधिक काट्याची लढत होईल, असे बोलले जात आहे. भाजपचे नेते मनोज पालारपवार यांनी आपल्या पत्नीला प्रभाग क्र. १६ तर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे यांनी आपल्या पत्नीला प्रभाग क्र. १३ मधून मैदानात उतरविल्याने तेथेही प्रतिष्ठेची लढत होईल, असे चिन्ह आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद वायलालवार यांच्या सुनबाई प्रभाग क्र. १२ मधून मैदानात आहे. महिलांची मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दाखल झाल्याने चामोर्शीच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. महिला उमेदवारांसोबत त्यांचे यजमान व नातलगही प्रचारासाठी जोरदार भिडून आहेत. (तालुका प्रतिनिधी)