चलाख यांच्याकडे शिक्षणाधिकारीचा प्रभार
By Admin | Updated: May 15, 2017 01:37 IST2017-05-15T01:37:16+5:302017-05-15T01:37:16+5:30
जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षणाधिकारी (प्राथ.) या पदाचा प्रभार याच विभागातील उपशिक्षणाधिकारी एम. एन. चलाख यांच्याकडे सोपविला आहे.

चलाख यांच्याकडे शिक्षणाधिकारीचा प्रभार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षणाधिकारी (प्राथ.) या पदाचा प्रभार याच विभागातील उपशिक्षणाधिकारी एम. एन. चलाख यांच्याकडे सोपविला आहे. चलाख यांनी ११ मे पासून शिक्षणाधिकारी (प्राथ.) या पदाचा प्रभार स्वीकारला.
तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्राथ.) ३१ जानेवारी २०१७ ला सेवानिवृत्त झाल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी आत्राम यांच्याकडे १ फेब्रुवारीला प्रभार सोपविण्यात आला होता. परंतु प्रशासकीय कामाचा व्याप व निकड लक्षात घेता जि. प. प्रशासनाने सदर पदाचा अतिरिक्त प्रभार उपशिक्षणाधिकारी चलाख यांच्याकडे सोपविला आहे. चलाख यांच्याकडे उपशिक्षणाधिकारी पदाव्यतिरिक्त उपशिक्षणाधिकारी (सर्व शिक्षा अभियान)चा सुद्धा अतिरिक्त प्रभार आहे.