दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:38+5:302021-03-15T04:32:38+5:30
गडचिरोली : आरमोरी शहरातील दोन दारू विक्रेत्यांकडून मोहफुलाची एकूण ३० लीटर दारू जप्त करीत दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला ...

दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
गडचिरोली : आरमोरी शहरातील दोन दारू विक्रेत्यांकडून मोहफुलाची एकूण ३० लीटर दारू जप्त करीत दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरमोरी पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईमुळे शहरातील दारूविक्रेत्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
आरमोरी शहरात दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. छोट्या - मोठ्या दारूविक्रेत्यांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरातील अवैध दारूविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरमोरी पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करण्याचे नियोजन केले. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे, शहरातील गायकवाड चौकातील सतीश चंद्रमनी शंभरकर या दारू विक्रेत्याच्या घराची तपासणी केली असता २५ लीटर मोहाची दारू सापडली. दुसरी कारवाई शहरातील बाजार टोली येथे करण्यात आली. येथील दारूविक्रेता धर्मा चन्ने याच्या घराची तपासणी केली असता ५ लीटर मोहफुलाची दारू मिळाली. शहरातील दोन ठिकाणच्या कारवाईतून मोहफुलाची ३० लीटर दारु जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही दारूविक्रेत्यांवर आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शहरात केलेल्या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई ठाणेदार दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार शेडमाके, चिकणकर यांनी केली.