शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीचा कारभारही प्रभारींवरच

By admin | Updated: June 11, 2015 01:51 IST

लहान बालकांचे संस्कार मंदिर मानल्या जाणाऱ्या अंगणवाडींनाही रिक्त पदांचे ग्रहण लागले असून जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडीत अंगणवाडी सेविका ...

१३६ जागा रिक्त : तीन ते सहा वयोगटातील बालकांची होत आहे कुचंबणा
गडचिरोली : लहान बालकांचे संस्कार मंदिर मानल्या जाणाऱ्या अंगणवाडींनाही रिक्त पदांचे ग्रहण लागले असून जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडीत अंगणवाडी सेविका व मदतनिसाचे एकूण १३६ पदे रिक्त आहेत. बहुतांश अंगणवाडीचा कारभार प्रभारी अंगणवाडी सेविकेच्या भरवशावर सुरू असल्याने तीन ते सहा वयोगटातील अंगणवाडीत दाखल बालकांची कुचंबणा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अंगणवाडीच्या माध्यमातून लहान बालकांवर चांगले संस्कार करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतल्या जाते. लहान बालक व गरोदर माताना पोषण आहार उपलब्ध करून दिल्या जाते. त्याचबरोबर गरोदर माताना आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्याची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी सेविका व मदतनीस पार पाडतात.
शासनाने गाव तिथे अंगणवाडी व काही मोठ्या गावांमध्ये दोन ते तीन अंगणवाड्या स्थापन केल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ७७१ अंगणवाड्या व ५१८ मिनी अंगणवाड्या आहेत. अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत राहतात. १७१ अंगणवाड्यांपैकी ३६ अंगणवाडी सेविका व ५५ अंगणवाडी मदतनिसांची पदे रिक्त आहेत. ज्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकेचे पदे रिक्त आहे. त्या अंगणवाडीत जवळपासच्या गावातील अंगणवाडी सेविकेवर सोपविण्यात आला आहे. मात्र स्वत:ची अंगणवाडी सांभाळून दुसऱ्या गावाची अंगणवाडी सांभाळताना अंगणवाडी सेविकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बऱ्याचवेळा लहान बालकांकडे दुर्लक्ष होत आहे. ज्या अंगणवाडीत मदतनिसाचे पद रिक्त आहे, तेथील अंगणवाडी सेविकेलाच मदतनिसाचे काम करावे लागत आहे. मिनी अंगणवाडीमध्ये केवळ अंगणवाडी सेविका राहते. त्यामुळे रिक्त पदांचा प्रभार गावातीलच अंगणवाडी सेविकेवर सोपविला जात आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या रिक्त पदांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत आहे. लहान बालक व गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेण्याची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर असल्याने सदर पदे भरण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)