शहरं
Join us  
Trending Stories
1
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
2
NEET Paper Leak : प्रश्न जुळवल्यानंतर मला धक्काच बसला', नीट पेपरफुटी उघडकीस आणणाऱ्या शिक्षकांची मोठी माहिती
3
'मेलोडी गिफ्ट'वर राहुल गांधींची टीका; म्हणाले, "शेतकरी, तरुण, महिला, कामगार, व्यापारी रडत असताना..."
4
१२ मे २०२५ ते १२ मे २०२६; ओळख, लग्न अन् वर्षभरातच ट्विशा शर्माच्या आयुष्याचा भयंकर शेवट!
5
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
6
प्रियकरासाठी दोन चिमुरड्यांना बसमध्ये सोडले; चिठ्ठीत लिहिले, "...यांना सुखरूप पोहचवा!"
7
Travel : भारताचं 'लिटिल इंग्लंड'! रोमँटिक ट्रीपचा प्लॅन करताय? मग 'या'हिल स्टेशनला नक्की भेट द्या
8
'पार्टनर हो... नाहीतर १ कोटी दे,' बिल्डरला धमकी; भोपाळमध्ये पकडलेल्या 'हनी गर्ल' श्वेताबाबत धक्कादायक माहिती
9
पीएम मोदींमुळे पुन्हा चर्चेत आली 'Melodi', जाणून घ्या हे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीची कहाणी...
10
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
11
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
12
टेट्रा पॅकवर बाहेर अ‍ॅपलचे चित्र, आत…; प्रकार पाहताच सुप्रीम कोर्टाची नोटीस, सरकारला विचारणा
13
'यालाच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे म्हणतात", रेल्वेतील व्हिडीओ, शेजारी बसलेल्या तरुणीसोबत बघा काय करतोय?
14
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
15
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
16
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
17
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
18
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
19
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
20
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
Daily Top 2Weekly Top 5

पेसा अधिसूचनेत बदल करा; राज्यपालांना साकडे

By admin | Updated: April 26, 2015 02:02 IST

आदिवासी बहूल भागातील शासकीय, निमशासकीय पदावर त्या भागात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी उमेदवारांचीच भरती करण्याचा निर्णय पेसा

देसाईगंज : आदिवासी बहूल भागातील शासकीय, निमशासकीय पदावर त्या भागात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी उमेदवारांचीच भरती करण्याचा निर्णय पेसा अधिसूचना लागू झाल्यामुळे घेण्यात आला आहे. या अध्यादेशात दुरूस्ती करून नवीन ओबीसी प्रवर्गाच्या हिताचा अध्यादेश काढण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी व आमदार क्रिष्णा गजबे यांनी राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली.
यावेळी आमदारांसमवेत ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, रविशंकर बोमनवार, वामनराव सावसागडे आदी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात अनुसूचित जमाती बरोबरच बहुसंख्य ओबीसी प्रवर्गाचे नागरिक वास्तव्याला आहेत. अनेक गावात ओबीसी व आदिवासी समाज एकत्रितरित्या वास्तव्य करतात. मात्र ९ जून २०१३ रोजी भारत सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पेसा अधिसूचना अनुसूचित क्षेत्रासाठी लागू केली आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात एक हजार ३११ गावांमध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. येथे शासनाच्या १२ जागा या केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठीच राखीव राहणार आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाची मोठी गोची झाली आहे. ओबीसी समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ही बाब आमदार डॉ. देवराव होळी व आमदार क्रिष्णा गजबे यांनी राज्यपालांना समाजावून सांगितली. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी पेसा अधिसूचनेत बदल करण्यात यावा, अशी विनंती दोन्ही आमदारांनी राज्यपाल महोदयांकडे केली. यावेळी जिल्ह्याच्या विविध विकास प्रश्नावरही राज्यपालांशी चर्चा करण्यात आली. (वार्ताहर)