भारनियमनाच्या वेळेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:20 AM2018-10-20T01:20:40+5:302018-10-20T01:21:31+5:30

शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून भारनियमनाच्या वेळेत बदल केला जात असून आता दररोज सकाळी ६ ते १०.४५ यावेळेतच भारनियमन करण्यात येणार आहे, अशी माहिती खा.अशोक नेते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

Change in load time | भारनियमनाच्या वेळेत बदल

भारनियमनाच्या वेळेत बदल

Next
ठळक मुद्देखासदारांची माहिती : शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून भारनियमनाच्या वेळेत बदल केला जात असून आता दररोज सकाळी ६ ते १०.४५ यावेळेतच भारनियमन करण्यात येणार आहे, अशी माहिती खा.अशोक नेते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धानपीक शेवटच्या टप्प्यात असताना अखेरच्या पावसाने पाठ फिरविली. अशा स्थितीत अनेक शेतकरी मोटारपंपच्या सहाय्याने धानपिकाला वाचविण्याची धडपड करीत होते. मात्र भारनियमनामुळे शेतकऱ्यांना सिंचन सुविधेत अडचण निर्माण झाली होती. सदर प्रश्नाबाबत आपण अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन ही समस्या मांडली. त्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून भारनियमनाच्या वेळेत बदल करून घेतल्याचे खा.नेते म्हणाले.
गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यात प्रामुख्याने धानपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या हातातून धानपीक जात आहे. शिवाय शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे भारनियमन बंद करण्यात यावे, अशा मागणीवजा तक्रारी व मागणीसुद्धा अनेक शेतकºयांनी आपल्याकडे केल्याचे खा.अशोक नेते यांनी यावेळी सांगितले.
चर्चेदरम्यान ना.मुनगंटीवार यांनी थेट ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी लागलीच संपर्क साधला. त्यांनी सुरुवातीला महावितरणची अडचण सांगितली. मात्र ना.मुनगंटीवार यांनी आवश्यक तेवढा निधी व कोळसा आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ, मात्र दिवसा व रात्रीचे भारनियमन बंद करा, असे त्यांना सांगितले. दरम्यान ना.मुनगंटीवार यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व मुख्य सचिव तसेच कोळसा खाणीच्या अधिकाºयांशी चर्चा केली. त्यामुळे हा प्रश्न सुटला, असे नेते म्हणाले.
पत्रपरिषदेला पं.स.उपसभापती विलास दशमुखे, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, अविनाश पाल, श्रीकृष्ण कावणपुरे व प्रकाश अर्जुनवार उपस्थित होते.

Web Title: Change in load time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज