स्वत:ची व जिल्ह्याची ओळख बदलविणार

By Admin | Updated: December 13, 2014 22:37 IST2014-12-13T22:37:59+5:302014-12-13T22:37:59+5:30

जिल्ह्याचे खासदार व माझे सहकारी नवनिर्वाचित आमदारद्वय तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींच्या सामूहिक प्रयत्नाने लोकांच्या हितासाठी झटण्याचे ठोस अभिवचन राज्याचे आदिवासी विकासमंत्री

To change the identity of the self and the district | स्वत:ची व जिल्ह्याची ओळख बदलविणार

स्वत:ची व जिल्ह्याची ओळख बदलविणार

गडचिरोलीत सत्कार : अम्ब्रीशराव महाराज यांचे प्रतिपादन
गडचिरोली : जिल्ह्याचे खासदार व माझे सहकारी नवनिर्वाचित आमदारद्वय तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींच्या सामूहिक प्रयत्नाने लोकांच्या हितासाठी झटण्याचे ठोस अभिवचन राज्याचे आदिवासी विकासमंत्री राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव सत्यवानराव आत्राम यांनी दिले. आगामी भविष्यकाळात ‘राजा’ म्हणून असलेली माझी प्रतिमा पुसून काढण्यासोबतच मागास-मागास म्हणून उर्वरित महाराष्ट्रात हिणविल्या जाणारी ‘गडचिरोली’ जिल्ह्याची ओळखही बदलविणार, असे नि:संदिग्ध आश्वासनही अम्ब्रीशरावांनी दिले.
राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर गडचिरोलीत प्रथम आगमन झाल्यावर येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे होते. मंचावर विशेष अतिथी म्हणून खासदार अशोक नेते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजपचे संघटन मंत्री आशिष वांदिले, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार आदी उपस्थित होते. यावेळी खासदार अशोक नेते यांनी केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाचे शासन असून जिल्ह्यात तीन आमदार पैकी एक राज्यमंत्री सद्य:स्थितीत असल्याने मागील १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर विकासाभिमुख मागण्यांची पूर्तता होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. देवराव होळी यांनी राज्यमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्व भागाच्या विकासाला चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. जिल्ह्यातील धान उत्पादकांनाही भाव देण्याच्या दृष्टीने राज्यमंत्री प्रयत्नशिल आहेत, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अम्ब्रीशराव महाराज यांनी सडक, पाणी, वीज या प्रमुख मागण्यांचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जातील व या जिल्ह्यातील स्थानिकांना नोकरभरतीतसुध्दा घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. प्रास्ताविक व संचालन प्रशांत भृगुवार तर आभार प्रशांत वाघरे यांनी मानले. याप्रसंगी भाजपचे प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे यांचाही सत्कार करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: To change the identity of the self and the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.