शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राखडी पहाडी परिसर दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 23:34 IST

जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी एटापल्ली तालुका हा छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असून या तालुक्याची निर्मिती गडचिरोली जिल्ह्याची स्थापना होण्यापूर्वी १ ते १९८१ ला झाली. तालुक्याला उत्तर-दक्षिण बांडिया नदी वाहत असून या नदीच्या किनाऱ्याजवळील जमिनीला नदीच्या पाण्यापासून सिंचन करता येते.

ठळक मुद्देवारसा गडचिरोलीचा

जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी एटापल्ली तालुका हा छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असून या तालुक्याची निर्मिती गडचिरोली जिल्ह्याची स्थापना होण्यापूर्वी १ ते १९८१ ला झाली. तालुक्याला उत्तर-दक्षिण बांडिया नदी वाहत असून या नदीच्या किनाऱ्याजवळील जमिनीला नदीच्या पाण्यापासून सिंचन करता येते. तसेच नदी सूरजागड डोंगरामधून वाहत असल्यामुळे पेट्टा या गावाजवळ निसर्गरम्य असे. पर्यटनस्थळ निर्माण झाले आहे. या सूरजागड डोंगरामध्ये लोखंडाकरिता आवश्यक असा उत्तम प्रतीचा लोहखनिज उपलब्ध असून या लोहखनिजापासून लोखंड पोलादाचे उद्योग निर्माण करण्यासाठी विविध कंपन्यांचे प्रस्ताव शासनाकडे आले आहेत. एटापल्ली तालुक्यात जानेवारी महिन्याच्या ५, ६, ७ या तीन दिवस आदिवासी बांधवांचा मोठा यात्रा उत्सव साजरा केला जातो. संपूर्ण पंचक्रोशीतील आदिवासी येथे येतात. व ते सुरजागड पहाडावर असलेल्या गावामध्ये ठाकूरदेवाची पूजा करतात. या गावातील मंदिरामध्ये घोड्यावर बसलेल्या ठाकूरदेवाच्या मूर्तीची पूजा झाल्यानंतरच यात्रेला प्रारंभ होतो. आदिवासी समाजासाठी ठाकूरदेवाची आराधना ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. यात्रेच्या दुसºया दिवशी गावातील पुजारी आणि पोलिस पाटील व महत्त्वाची मंडळी ५ किमी उंचावर सुरजागड लोह पहाडीवर ढोलताशाच्या निनादात व आदिवासी रेला नृत्यासोबत जाऊन पहाडावरील ठाकूरदेवाच्या दुसºया मूर्तीचीही पूजा करतात. या यात्रेदरम्यान आदिवासी बांधव आपल्या परंपरेनुसार कोंबड्या व बकऱ्यांचा बळीही देवाला नवस म्हणून देतात. व या भागात सुखशांती लाभू दे, अशी प्रार्थना ठाकूरदेवाकडे करतात. ठाकूरदेवाला केलेल्या या प्रार्थनेमुळे आपल्यावरची संकटं दूर होतात, अशी आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे. एटापल्ली-कसनसूर मार्गावर चंद्राखंडी देवीची मूर्ती आहे. या मार्गावरून ये-जा करणाºयांना वाघ आणि सिंह अतिशय शांत मुद्रेमध्ये बसून असतात, असे जाणवते, अशी दंतकथा या भागात प्रचलित आहे. या तालुक्यासाठी चंद्राखंडी देवीची मूर्ती ही जागृत देवस्थान असल्याचे नागरिक मानतात. तोडसा येथे तीन दिवसीय दसरा उत्सव साजरा केला जातो. या परिसरातील लोकं एकत्र येऊन एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देतात व दसºयाचा सण साजरा करतात. एटापल्ली तालुक्यात निसर्गाने भरभरून साधन संपत्ती दिली आहे. या भागात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. परंतु अद्याप या दृष्टीने प्रयत्न झालेले नाही. सुरजागड पहाडीवर अभ्यासकांना मोठ्या प्रमाणावर अभ्यासाची संधी उपलब्ध आहे.राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन सदर चंद्राखडी पहाडी परिसराचे सौंदर्यीकरण करून विकास केला तर येथे पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :tourismपर्यटन