चामोर्शीच्या महिला सरपंचास मारहाण

By Admin | Updated: June 7, 2014 23:56 IST2014-06-07T23:56:24+5:302014-06-07T23:56:24+5:30

चामोर्शी ग्रामपंचायतीच्या सरपंच मालन बोदलकर या काही ग्रा.पं. सदस्य व कर्मचार्‍यांना घेऊन ग्रामपंचायत मालकीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी बालोद्यानात गेल्या. दरम्यान अतिक्रमण काढण्यास विरोध

Chamorshi women's sarpanchas marriages | चामोर्शीच्या महिला सरपंचास मारहाण

चामोर्शीच्या महिला सरपंचास मारहाण

चामोर्शी : चामोर्शी ग्रामपंचायतीच्या सरपंच मालन बोदलकर या काही ग्रा.पं. सदस्य व कर्मचार्‍यांना घेऊन ग्रामपंचायत मालकीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी बालोद्यानात गेल्या. दरम्यान अतिक्रमण काढण्यास विरोध करून सरपंच बोदलकर यांना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रविशंकर बोमनवार व त्यांच्या मुलांनी अर्वाच्च शब्दात शिविगाळ करून मारहाण केल्याची घटना ६ जून रोजी सांयकाळी ७ वाजता घडली. या घटनेसंदर्भात सरपंच मालन बोदलकर यांनी बोमनवार यांच्या विरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सरपंच मालन बोदलकर व काही ग्रा.पं. सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आज शनिवारला पत्रकार परिषद बोलाविली. यावेळी शिविगाळ व मारहाणीच्या घटनेचा जाहीर निषेध केला. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत सरपंच बोदलकर व उपस्थित ग्रा.पं. सदस्यांनी केली.
यावेळी माहिती देताना सरपंच बोदलकर म्हणाल्या, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बालोद्यानात अतिक्रमण करून संरक्षण भिंत तोडत असल्याची माहिती आपणाला मिळाली. यावरून आपण उपसरपंच नागोबा पिपरे, ग्रा.पं. सदस्य सुमेध तुरे, राहूल नैताम, अविनाश चौधरी, मधुकर गेडाम, विजय शात्तलवार, ग्रामविकास अधिकारी प्रदीप भांडेकर व काही कर्मचार्‍यांसह बालोद्यानाच्या ठिकाणी पोहोचलो. दरम्यान रवी बोमनवार व त्यांच्या मुलांनी आपणाला शिविगाळ करून मारहाण केली, असे सरपंच बोदलकर यांनी सांगितले. या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवार व मंगळवारला चामोर्शी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याचे सरपंच बोदलकर यावेळी म्हणाल्या. (शहर प्रतिनिधी)
 

Web Title: Chamorshi women's sarpanchas marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.