चामोर्शी-हरणघाट मार्ग दुरवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 21:36 IST2019-03-03T21:35:49+5:302019-03-03T21:36:09+5:30
चामोर्शी तालुक्यातील डांबरीकरण झालेले सर्वच रस्ते उखडून गेलेले आहेत. गिट्टी बाहेर आल्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. चामोर्शी-आष्टी व चामोर्शी-हरणघाट तसेच चामोर्शी-गडचिरोली हे वर्दळीचे मार्ग पूर्णत: उखडल्याने वाहनधारकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

चामोर्शी-हरणघाट मार्ग दुरवस्थेत
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील डांबरीकरण झालेले सर्वच रस्ते उखडून गेलेले आहेत. गिट्टी बाहेर आल्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. चामोर्शी-आष्टी व चामोर्शी-हरणघाट तसेच चामोर्शी-गडचिरोली हे वर्दळीचे मार्ग पूर्णत: उखडल्याने वाहनधारकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरील खड्डे बुजविण्यापेक्षा सदर रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
तालुक्यातील सदर तिनही मार्ग खड्डेमय झाल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. परिणामी दुचाकी व चारचाकी वाहने भंगार होत आहेत. परिणामी जीव मुठीत घेऊन चालकांना वाहने चालवावी लागत आहेत. उखडलेले रस्ते केवळ खड्डे बुजवून दुरूस्त होऊ शकत नाही. त्यासाठी दुरवस्था झालेल्या रस्त्याचे नूतनीकरण करणे अत्यावश्यक आहे. मागणीनंतर खड्डे बुजविल्यामुळे वाहनचालकाचे समाधान होणारच नाही. कारण बुजविलेले खड्डे एक ते दोन महिन्यातच उखडून जातात व रस्ता जैसे थे होतो. हा नित्याचा अनुभव लक्षात घेता खड्डे बुजविण्यावर शासन व प्रशासनाने निधी व्यर्थ खर्च करण्यापेक्षा याच निधीतून रस्त्याचे नूतनीकरण केल्यास ते अधिक काळ टिकेल, असे बोलले जात आहे.