चामोर्शीत काँग्रेस शेर तर अहेरी भाजपची
By Admin | Updated: November 8, 2015 01:33 IST2015-11-08T01:33:27+5:302015-11-08T01:33:27+5:30
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या चामोर्शी नगर पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

चामोर्शीत काँग्रेस शेर तर अहेरी भाजपची
निर्विवाद बहुमत : चामोर्शीत काँग्रेसला तर अहेरीत भाजपला निर्विवाद बहुमत, कोरचीत भाजप-सेनेची मुसंडी
गडचिरोली : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या चामोर्शी नगर पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. १७ पैकी ९ जागांवर काँग्रेसने विजय मिळवून या नगर पंचायतीवर निर्विवाद बहुमत मिळविले आहे. भाजपला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. भाजपचे आमदार राहत असलेल्या वॉर्डातही भाजपचा दारूण पराभव झाला आहे. तर गेली अनेक वर्ष अहेरी राजनगरीवर नाग विदर्भ आंदोलन समिती ग्राम पंचायतीच्या माध्यमातून आपली सत्ता राखून होती. नाविसंचे केंद्रीय अध्यक्ष राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरही अहेरी नगर पंचायतवरची भाजपची सत्ता त्यांनी राखून ठेवण्यात यश मिळविले आहे.
अहेरी : अहेरी नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ९ जागा मिळविल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जागांवर सत्ता काबीज केली तर अपक्षांच्या वाट्याला ३ जागा मिळाल्या. निवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळविला आला नाही.
अहेरी येथील नगर पंचायत निवडणुकीत अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक १ मधून भारतीय जनता पक्षाच्या रेखा तुळशिदास सडमेक यांनी २७२ मते मिळवीत विजय प्राप्त केला. त्याखालोखाल संगीता महेश मडावी यांना १४८, सरिता रवींद्र सिडाम यांना १० मते तर नोटाला ४ मतदारांनी पसंती दर्शविली. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या हर्षाताई रवींद्र ठाकरे यांनी २६१ मते मिळवित विजय पटकाविला. निवडणुकीत सारिका जनार्धन अन्नलदेवार यांना २३९, नीता सोमाजी कोटरंगे यांना ३७ मते तर नोटावर २० जणांनी मतदान केले. अनुसूचित जमाती स्त्री राखीव प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपच्या मालुताई रामा इष्टाम यांनी १४८ मते प्राप्त करीत दणदणीत विजय मिळविला. त्या खालोखाल उषाताई राजू आत्राम यांना १४४, इंदूमती गोपाळराव मडावी यांना ११६ मते मिळाली तर १३ जणांनी नोटाचा वापर केला. सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे शैलेंद्र मोहनराव पटवर्धन यांनी २७५ मते घेत विजय मिळविला. निवडणुकीत मुकेश मधुकर नामेवार यांना २५७, राम पोचा बावणे यांना ६ मते, शेख रिजवान रहेमत यांना ७३ मते मिळाली तर ७ जणांनी नोटाचा वापर केला. सर्वसाधारण स्त्री राखीव प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँगे्रसच्या ममता शैलेंद्र पटवर्धन यांनी १५० मते मिळवित विजय संपादन केला. निवडणुकीत आशाताई राजू कोसरे यांना ६५ मते, महेजबीन अब्दुल शफीक शेख यांना ९२ मते मिळाली तर १ उमेदवाराने नोटाचा वापर केला. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव प्रभाग क्रमांक ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना श्रीनिवास विरगोनवार यांनी २०९ मते प्राप्त करीत दणदणीत विजय मिळविला. त्याखालोखाल जयश्री विजय खोंडे यांना १७१, ज्योत्स्ना सदाशिव गुरनुले यांना ७ मते मिळाली तर ३ जणांनी नोटाला पसंती दर्शविली. अनुसूचित जाती स्त्री राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपच्या स्मिता संतोष येमुलवार यांनी २५४ मते प्राप्त करीत दणदणीत विजय मिळविला. निवडणुकीत मीना मलय्या दुर्गे यांना ६२ मते सुनीता यशवंत सुनतकर यांना ७ मते मिळाली तर ४ जणांनी नोटाला मतदान केले. अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक ८ मधून भाजपच्या अन्नपुर्णा दामोधर सिडाम यांनी २३९ मते प्राप्त करीत विजय संपादन केला. निवडणुकीत शोभा नागन्ना कुमरे यांना ४ मते, लक्ष्मीबाई वसंतराव कुळमेथे यांना १९६ मते मिळाली तर १७ जणांनी नोटाला मतदान केले. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेल्या प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपचे श्रीनिवास नागोराव चटारे यांनी १६७ मते मिळवित विजय संपादन केला. निवडणुकीत बाल्या पोचरेड्डी ओडेट्टीवार यांना ५१ मते, गद्देवार श्रीकांत पोचरेड्डी यांना १३५ मते, गोडसेलवार प्रशांत विलास यांना २५ मते, सुमित अशोक मुडावार यांना ६३ मते, चंद्रशेखर रामय्या रापर्तीवार यांना ३ मते, रापर्तीवार विलास नारायण यांना १९ मते मिळाली तर ७ जणांनी नोटाला पसंती दर्शविली. नागरिकांचा प्रवर्ग स्त्री राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक १० मधून भाजपच्या प्राजक्ता सचिन पेदापल्लीवार यांनी १७७ मते प्राप्त करीत दणदणीत विजय मिळविला. निवडणुकीत कामीडवार विजयालक्ष्मी रोहिदास यांना ११६ मते, जक्कोजवार अश्विनी बाबुराव यांना ७९, मनीषा विस्तारू मोहुर्ले यांना ५ मते, पुष्पा शंकर रत्नावार यांना ११९ मते मिळाली तर ६ जणांनी नोटाचा वापर केला. सर्वसाधारणसाठी प्रभाग क्रमांक ११ मधून अपक्ष अमोल सुधाकरराव मुक्कावार यांनी १९७ मते प्राप्त करीत विजय मिळविला. निवडणुकीत काझी जलिलोद्दीन जबीबोद्दीन यांना २ मते, मगडीवार शंकर व्यंकटेश यांना ११९ मते, मद्दिवार साईप्रसाद त्र्यंबकराव यांना ६५ मते मिळाली तर ६ जणांनी नोटाला पसंती दर्शविली. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेल्या प्रभाग क्रमांक १२ मधून अपक्ष कबीर शेख कबीर नासर महमद यांनी १९२ मते प्राप्त करीत विजय मिळविला. तर गोपाल चिमणाजी गुरनुले यांना २० मते, रावसाहेब बोंदय्या पडालवार यांना १७ मते, भंडारी श्रीनिवास पोचम यांना ३ मते, राजेंद्रप्रसाद मगनवार ११ मते, रंगूलवार राजेश्वर वीरय्यांनी यांना १८१ मते, बब्बू शेख नासर महम्मद यांना १२ मते, शेख महम्मद हनीफ यांना ४९ मते मिळाली. तर २ जणांनी नोटाला पसंती दर्शविली. सर्वसाधारणसाठी असलेल्या प्रभाग क्रमांक १३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख जावेद ताजमोहम्मद यांनी १५० मते मिळवित विजय संपादन केला. निवडणुकीत अमोल भीमराव अलोेणे यांना ७८ मते, पंदालवार दीपक राजन्ना यांना ११ मते, अश्फाक अजमल यांनी ३१ मते, शेख अब्दुल रहेमान मुमताज अली यांना २ मते, गौस मोहम्मद खान मोहम्मद शेख यांना ४५ मते, शेख जमीर हुसेन महेबुब यांना ३१ मते, मोहम्मद गौसभाई शेख दाऊद यांना १२० मते, प्रभाकर बुधाजी शेंडे यांना ३७ मते, राममोहन व्यंकटेश समुद्रालवार यांना ७ मते, सय्यद महेबुब अली सय्यद जलाल यांना ५८ मते मिळाली तर ८ जणांनी नोटाचा वापर केला. सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक १४ मधून भारतीय जनता पक्षाच्या कमल दिलीप पडगेलवार यांनी २३७ मते मिळवित दणदणीत विजय मिळविला. निवडणुकीत सीमा किशोर शिवरकर यांना ६ मते, शेख आसमा शेख यांना १४७ मते, शेख नौशादबानो अनुक यांना ४९ मते, साजीदा परवीन महेबुबअली सय्यद यांना २२ मते, सुद्दालवार शारदा पोचय्या यांना २० मते मिळाली तर ११ जणांनी नोटाचा वापर केला. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वनाथराव जगन्नाथराव आत्राम यांनी १३८ मते प्राप्त करीत विजय मिळविला. निवडणुकीत पौर्णिमा पुरूषोत्तम इष्टाम यांना १२३ मते, रघुनाथ गजानन तलांडे यांना २४ मते, अर्चना लचमा मडावी यांना ५७ मते, सतीश हनमंतु मडावी यांना ४ मते, यशोदा शंकर सडमेक यांना ८ मते, विलास बुधाजी सिडाम यांना ७ मते मिळाली. केवळ १ मतदाराने प्रभागात नोटाचा वापर केला. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक १६ मधून अपक्ष संजय सोमा झाडे यांनी १५३ मते प्राप्त करीत विजय मिळविला. निवडणुकीत सुरेंद्र नारायण अलोणे यांनी ८२ मते, गोवर्धन छत्रपती आडकू यांनी १३ मते, चौधरी राजू नारायण यांना ५ मते जुमळे कांता नागमल्लू यांना १७ मते, झाडे दिवाकर लचमा यांना ११६ मते, बोरकुटे विजयराम गंगाराम यांना ४१ मते, रामटेके विनोद राजम यांना ११९ मते, सुनतकार शामराव यशवंत यांना ७० मते मिळाली. ९ जणांनी नोटाला प्रसंती दर्शविली. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक १७ मधून भाजपचे नारायण दशरथ सिडाम यांनी १७४ मते प्राप्त करीत विजय मिळविला. आत्राम नागेश्वर दलशहा यांना ७६ मते आत्राम भीमराव मधुकर यांना ४६ मते, आत्राम मारोती किष्टामी यांना ८० मते, उईके अतुल सुरेश यांना ९ मते, गेडाम बिचमशहा लच्चा यांना २८ मते, तिरूपती ईश्वर तलांडे यांना ५ मते, तोरेम नागेश लक्ष्मण यांना ८३ मते मिळाली तर ३० जणांनी नोटाचा वापर केला.
चामोर्शी : स्थानिक नगर पंचायतीत एकूण १७ जागांपैकी ९ जागांवर काँग्रेसने विजय प्राप्त करीत एकहाती सत्ता हस्तगत केली आहे. या नगर पंचायतीत भाजपाला ५, राष्ट्रवादी काँग्रेसला १, शिवसेनेला १ व अपक्ष उमेदवाराला १ जागा मिळाली आहे.
चामोर्शी नगर पंचायतीत प्रभाग क्र. १ मध्ये अपक्ष उमेदवार अनिल नीलकंठ गेडाम यांना १०७, राष्ट्रवादी काँग्रेसचे खुशाल मुंगसू गेडाम यांना १०, अपक्ष उमेदवार मधुकर गोसाई गेडाम यांना ९८, काँग्रेसचे मधुकर पत्रू गेडाम यांना १८४, शिवसेनेचे उमेदवार हरिदास दामोधर कुंभरे यांना १६ मते प्राप्त झाली. भाजपाचे विजय पत्रू गेडाम यांना २०४ मते प्राप्त झाली असून ते विजयी झाले आहेत. पाच मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्र. २ मध्ये काँग्रेसचे उमदेवार सुनीता संजय धोडरे यांना ३४८ मते मिळाली आहेत. त्या विजयी झाल्या असून भाजपाच्या उमेदवार अर्चना अविनाश कत्रोजवार यांना २०५ मते मिळाली आहेत, त्या पराभूत झाल्या आहेत. २० मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्र. ३ मध्ये अपक्ष उमेदवार श्रीकृष्ण भजनराव नैताम यांना १७८, संतोष रामुजी भांडेकर यांना ७१, राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम मारोती शेटे यांना १४६, सुभाष मारोती लटारे यांना ६० मते पडली आहेत. काँग्रेसचे श्यामराव श्रावण लटारे यांना सर्वाधिक २२२ मते मिळाली आहेत. ते विजयी झाले आहेत. या प्रभागात नऊ उमेदवारांनी नोटाचा वापर केला.
प्रभाग क्र. ४ मध्ये अपक्ष उमेदवार अरूणा हनुमंत डंबारे यांना ५४, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमा हर्षकुमार धोडरे यांना ५१, अपक्ष उमेदवार मंगला देवानंद वालदे यांना ८७, भाजपाच्या संगीता सुधाकर वासेकर यांना ११६ व काँग्रेसच्या सविता तोमदेव पिपरे यांना १७१ मते मिळाली आहेत. त्या विजयी झाल्या आहेत. सहा मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्र. ५ मध्ये अपक्ष उमेदवार सुनील दादाजी कावळे यांना ११, राष्ट्रवादी काँग्रेसचे मारोती मधुकर दासरवार यांना २४, रामेश्वर बंडू सेलुकर यांना १३२ व काँग्रेसचे विजयी उमेदवार प्रमोद मारोती वायलालवार यांना २२८ मते मिळाली आहेत. या वॉर्डात एकही मत नोटाचा वापर झाला नाही. प्रभाग क्र. ६ मध्ये मोसिनखॉन पठाण यांना ९, दिवाकर आडकू शेटे यांना २०३ व भाजपाचे विजयी उमेदवार प्रशांत राधाकिसन येगलोपवार यांना ३४४ मते मिळाली आहेत. प्रभाग क्र. ७ मध्ये लोमा गंगाधर उंदीरवाडे यांना १०७, यशोधरा अरूण लाकडे यांना ११८ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार प्रज्ञा धीरज उराडे यांना १४६ मते मिळाली आहेत. पाच मतदारांनीनोटाचा वापर केला. प्रभाग क्र. ८ मध्ये नागेद्र उत्तम कुडवे यांना १४, हनुमंत कृष्णाजी डंबारे यांना २५, अनिल दौलत भैसारे यांना १७७, श्यामराव नकटू म्हशाखेत्री १५८, लक्ष्मण चंटी रामटेके ३ व काँग्रेसचे विजयी उमेदवार सुमेध माणिकराव तुरे यांना २३१ मते मिळाली आहेत. एका मतदाराने नोटाचा वापर केला. प्रभाग ९ मध्ये भाजपाच्या विजयी उमेदवार कविता दिलीप किरमे यांना २२४ मते मिळाली आहेत. गीता सुरेश गद्दे यांना ७० तर मालन मधुकर बोदलकर यांना २१७ मते मिळाली आहेत. १६ मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्र. १० मध्ये अनिता संतोष नैताम यांना ११५, ललिता लक्ष्मण बुरांडे यांना १६१, मोहिनी मुरलीधर कोठारे यांना ६३ व काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवार मंदा सुभाष सरपे यांना १६८ मते मिळाली आहेत. नऊ मतदारांनी नोटाचा वापर केला.
प्रभाग क्र. ११ मध्ये अविनाश गंगाधर कारगिरवार यांना ७, विनोद दुर्योधन चलाख यांना १५५, गजेंद्र भास्कर दाडमवार १९ व काँग्रेसचे विजयी उमेदवार राहुल सुखदेव नैताम यांना ३७८ मते प्राप्त झाली आहेत. या वॉर्डात १७ मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्र. १२ मध्ये मेरूनिशा हासिम खान यांना ३७, संजना रामभाऊ भंडारवार यांना १२, माधवी विनोद पेशट्टीवार यांना २१७, शेख रहिमुनिसा शेख बब्बू यांना २१ व काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री पंकज वायलालवार यांना ३१८ मते मिळाली आहेत. प्रभाग क्र. १३ मध्ये काँग्रेसच्या संगीता संदेश कुनघाडकर यांना १७७ व भाजपाच्या विजयी उमेदवार रोशनी स्वप्नील वरघंटे यांना ४२८ मते मिळाली आहेत. आठ मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्र. १४ मध्ये सुधीर देवनाथ गडपायले यांना ११४, गोपाल मलय्या मेनेवार यांना ७७, मांतेशकुमार साईनाथ श्रीरामे यांना २०२ व विजय भास्कर शातलवार यांना २९७ मते मिळाली आहेत. पाच मतदारांनी नोटाचा वापर केला.
प्रभाग क्र. १४ मध्ये अल्का भाऊराव उपासे यांना ४३, जोत्स्ना उमाकांत कावळे यांना २५, अर्चना राजेश ठाकूर यांना १२२, शालू राजेश दुर्गे यांना ४०, छाया रवीशंकर बोमनवार यांना ९४, योगीता अमित साखरे यांना ३० व शिवसेनेच्या विजयी उमेदवार मंजूषा निमाई रॉय यांना २०६ मते मिळाली आहेत. पाच मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्र. १६ मध्ये अंजली अजय उरकुडे यांना ५९, प्रतीक्षा दादाजी काटकर यांना ११७, माधुरी कमलेश बर्लावार यांना १४३, मंजूषा देवानंद बोरकर यांना ३९, किशोरी अजय येनुगवार यांना २५ व भाजपाच्या विजयी उमेदवार मीनल मनोज पालारपवार यांना १५३ मते मिळाली आहेत. प्रभाग क्र. १७ मध्ये अपक्ष उमेदवार अविनाश केशरी चौधरी यांना २२१ मते मिळाली असून ते विजयी झाले आहेत. रेवनाथ तुळशिराम निकोडे यांना ७, पुरूषोत्तम बुरांडे यांना १३२, जयंत बुरांडे यांना ८१, जयराम मोहुर्ले यांना १७, बबनराव वडेट्टीवार यांना १७८, परशुराम सातार यांना ८, मोहन पांडुरंग सोमनकर यांना ५९ मते मिळाली आहेत. एका मतेदाराने नोटाचा वापर केला.