शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

नक्षल कारवाया रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:38 AM

नक्षलवाद्यांनी नोव्हेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढत अचानक हिंसक कारवाया सुरू केल्याने पोलीस यंत्रणा त्रस्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवाद्यांनी नोव्हेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढत अचानक हिंसक कारवाया सुरू केल्याने पोलीस यंत्रणा त्रस्त आहे. त्यात आता त्यांना शनिवार दि.२ पासून सुरू होत असलेल्या पीएलजीए सप्ताहाचा सामना करावा लागणार आहे. नक्षल्यांना या सप्ताहात कोणत्याही नक्षल कारवाया घडविण्यात यश येऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशिल आहे. परंतू दहशतीत असलेल्या नागरिकांना दिलासा देऊन नक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडण्याचे कठीण आव्हान या सप्ताहात पोलिसांना पेलावे लागणार आहे.नक्षल चळवळीतील सदस्य केवळ पोलीस यंत्रणेला आपले शत्रू मानत असले तरी पोलिसांना मदत केल्याचा संशय असणारे सामान्य गावकरीही त्यांच्या दृष्टीने शत्रू ठरतात. यातूनच गेल्या १२ दिवसात चार नागरिकांची हत्या करून एकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला. यातून गावकºयांमध्ये आपली दहशत पसरविण्याचा हेतू नक्षल्यांनी बºयाच प्रमाणात साध्य केल्याचे दिसून येते. गेल्या जुलै-आॅगस्टमधील नक्षल्यांच्या शहीद सप्ताहात ज्या पद्धतीने गावोगावचे नागरिक नक्षल्यांविरूद्ध खुलेआम रस्त्यावर उतरून आवाज उठविताना दिसले. मात्र दहशतीमुळे यावेळी तशी परिस्थिती दिसत नाही. नागरिकांच्या मनात असंतोष असला तरी नक्षली दहशतीमुळे ते पुढे येण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्याचेही आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.नक्षल्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी सी-६० पथक आणि सीआरपीएफचे जवान डोळ्यात तेल घालून गस्त करीत आहे. याशिवाय बॉम्बशोधक-नाशक पथकाकडून तपासणी सुरू आहे. छत्तीसगड सीमेकडील भागात नक्षल्यांच्या हालचाली जास्त असल्यामुळे त्या भागावर नक्षलविरोधी अभियान अधिक आक्रमकपणे राबविले जाण्याची शक्यता आहे.अशा झाल्या ११ दिवसातील हिंसक घटनादि.१९ - भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील परसा कुटुंबियांवर रात्री घरी झोपेत असताना गोळीबार केला. यात जैनी मुरा परसा (३५) ही महिला जखमी झाली.दि.२१- धानोरा तालुक्यातील झाडापापडा गावाबाहेरच्या कोंबड बाजारात मंगळवारी दुपारी १.३० वाजतादरम्यान सुुनील तिलकबापू पवार (३५) या इसमाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.दि.२१- धानोरा तालुक्यातील चवेला ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया रानवाही येथील जादो पांडू जांगी (५२) या इसमाचे रात्री ११ वाजता नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सीमेत अपहरण करून मारहाण करीत त्यांची हत्या केली.दि.२२- धानोरा तालुक्यातील तोडे येथील सुरेश चिनू तोफा (२५) या युवकाचे सायंकाळी शेतातून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली.दि.२४- कोरची तालुक्यातील कोटगूल येथे घडविलेल्या बॉम्बस्फोटात एक पोलीस हवालदार शहीद तर दोन गंभीर जखमी झाले.दि.२६- कोरची तालुक्यातील पडियलमेट्टा जंगलात रात्री ८.३० च्या सुमारास सीआरपीएफच्या तुकडीवर नक्षल्यांनी हल्ला केला. या चकमकीत एक जवान शहीद, तर दोन जवान गंभीर जखमी झाले.दि.२९- अहेरी तालुक्यात पेरमिली उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील येरमणार येथे कोतवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.