दलालास तहसीलदाराची चपराक

By Admin | Updated: October 27, 2014 22:35 IST2014-10-27T22:35:07+5:302014-10-27T22:35:07+5:30

स्थानिक तहसिल कार्र्यालयात रेशन कार्डची दुयम प्रत बनवितांना कार्यालयातील दलालास नायब तहसिलदारांनी रंगेहात पकडल्याने दलालाचे बिंग फुटले.

Chalapare of Dalas Tehsilar | दलालास तहसीलदाराची चपराक

दलालास तहसीलदाराची चपराक

देसाईगंज : स्थानिक तहसिल कार्र्यालयात रेशन कार्डची दुयम प्रत बनवितांना कार्यालयातील दलालास नायब तहसिलदारांनी रंगेहात पकडल्याने दलालाचे बिंग फुटले.
रेशन कार्डासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या नागरीकास रेशनकार्ड सहज उपलब्ध होऊ शकत नाही़ मात्र तहसिल कार्यालयात दलालामार्फत रेशन तयार करण्याच्या प्रकरणामुळे तहसील कार्यालयाच्या प्रशासनावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून स्थानिक तहसिल कार्यालयात नवीन रेशन कार्ड बनविण्याच्या कामात टाळाटाळ करण्यात येत हाती़ मात्र रेशन कार्डची दुयम प्रत बनविण्यासाठी लाभार्थ्यांची चांगलीच गर्दी सदर कार्यालयात दिसून येत होती़ संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याने कमीशनच्या लालसे पोटी रेशन कार्डाची दुय्यम प्रत बनविण्यासाठी दलालाचा आधार घेत सर्व नियम धाब्यावर बसवून तहसीलदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले कोरे रेशन कार्डच दलालाच्या हवाली करून लाभार्र्थ्याकडून मनमानी रक्कम लुटण्याचा प्रकार सदर दलाल करीत असल्याच्या नागरिकाकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ मात्र याची साधी माहितीही तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना नसल्याने असे प्रकार सर्रास तहसील कार्यालयात सुुरू होते़. परंतू आज सोमवारी एका सुज्ञ नागरीकाच्या सतर्कतेने सदर प्र्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे साटेलोटे असलेल्या सबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे़ सर्वसामान्य नागरिकास तहसील कार्यालयातून रेशन कार्ड बनविणे म्हणजे तारेवरची कसरतच असते़ रेशनकार्र्ड बनविण्यात होत असलेल्या त्रासापायी कित्येक नागरीकांनी रेशन कार्ड तयार करण्याचे कार्यच मनातून काढून टाकले़ तहसील कार्यालयातून कार्ड तयार होऊ शकत नसल्याचे सांगुन कित्येकाना बाहेरचा रस्ता दाखविल्या जात आहे़ मात्र दलालामार्फत छुप्यामार्गाने कोणत्याही त्रासाविणा तहसील कार्यालयाच्या वरांडयातूनच रेशन कार्ड तयार करण्याचा गोेरखधंदा दलालानी गेल्या अनेक दिवसांपासून चालविला आहे. अशाच प्रकारचा रेशनकार्ड बनविताना नायब तहसिलदार ए़ बी़ मडावी व धाईत यांनी संबंधित दलालास रंगेहात पकडले़
कार्यालयाच्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे तहसील कार्यालयाच्या प्रशासनात प्रचंड खळबळ माजली आहे. (वार्ताहर)

Web Title: Chalapare of Dalas Tehsilar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.