जारावंडी येथे चक्काजाम आंदोलन
By Admin | Updated: December 6, 2015 01:20 IST2015-12-06T01:20:03+5:302015-12-06T01:20:03+5:30
जारावंडी तालुक्याची निर्मिती करून या परिसरातील समस्या सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी जारावंडी तालुका निर्माण कृती समितीच्या वतीने ....

जारावंडी येथे चक्काजाम आंदोलन
समस्या सोडवा : तालुका निर्मिती करा
एटापल्ली : जारावंडी तालुक्याची निर्मिती करून या परिसरातील समस्या सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी जारावंडी तालुका निर्माण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
जारावंडीपासून एटापल्ली हे तालुका ठिकाण सात किमी अंतरावर आहे. त्यामुळे प्रशासकीय कामे करण्यास नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जारावंडी परिसरात २० ते २५ हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे जारावंडी तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, जारावंडी ते एटापल्ली रस्त्याची दुरूस्ती व मजबुतीकरण करण्यात यावे, जारावंडी ते पेंढरी रस्त्याची रूंदीकरण करून खड्डे बुजवावे, जारावंडी-सरखेडा-भापडा रस्त्यावरील बांडिया नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे, जारावंडी येथील बीएसएनएल टॉवर सुरू करावे, प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जारावंडीचे सरपंच सुधाकर टेकाम, शालिकराम गेडाम, बब्बू शेख, हरिदास टेकाम आदींनी केले. (तालुका प्रतिनिधी)