काेरचीत भाजपतर्फे चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:23 IST2021-06-27T04:23:50+5:302021-06-27T04:23:50+5:30

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ओबीसी आरक्षण संपविण्याचा कट रचून, समस्त ओबीसी बांधवांच्या भावनेला ठेच पोहोचविली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ...

Chakka Jam by BJP in Karachi | काेरचीत भाजपतर्फे चक्का जाम

काेरचीत भाजपतर्फे चक्का जाम

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ओबीसी आरक्षण संपविण्याचा कट रचून, समस्त ओबीसी बांधवांच्या भावनेला ठेच पोहोचविली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजात प्रचंड रोष असल्याचा मत भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, जिल्हा सचिव प्रा.देवराव गजभिये, आनंद चौबे, तालुका अध्यक्ष नसरुद्दीन भामानी, कमल खंडेलवाल, रामकुमार नाईक, नंदलाल पंजवानी, केशव मोहुर्ले, गोविंद दरवडे, महादेव बन्सोड, विलास अंबादे, सदाराम नुरूटी, मेघश्याम जमकातन, दामोधर येवले, रवींद्र बनसोड, सुरेश काटेंगे, अनिल वाढई यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते. कोरची पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले, पो.उप.नि.समाधान फडोल, बेडगाव पोलीस मदत केंद्राचे पी.एस.ओ. नितीश पोटे, पोउपनि अनिल नानिकर यांच्या मार्गदर्शनात माेठा पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.

Web Title: Chakka Jam by BJP in Karachi