विदर्भवाद्यांचा ठिकठिकाणी चक्का जाम व जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:40 IST2021-08-27T04:40:20+5:302021-08-27T04:40:20+5:30
यावेळी कुरखेडा-कोरची मार्गावरील पुराडा रामगड टी-पॉईंटवर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाप्रमुख राजेंद्रसिंह ठाकूर यांचा नेतृत्वात सकाळी ११ वाजता आंदोलनाची ...

विदर्भवाद्यांचा ठिकठिकाणी चक्का जाम व जेलभरो आंदोलन
यावेळी कुरखेडा-कोरची मार्गावरील पुराडा रामगड टी-पॉईंटवर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाप्रमुख राजेंद्रसिंह ठाकूर यांचा नेतृत्वात सकाळी ११ वाजता आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. स्वतंत्र वेगळे विदर्भ राज्य, कोरोनाकाळातील वीज बिल माफी, पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घेणे यासह अनेक मागण्या लावून धरण्यात आल्या.
(बॉक्स)
तीन तास वाहतूक ठप्प
आंदोलनस्थळावर नायब तहसीलदार, तसेच विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देत चर्चा केली. मात्र, आंदोलकांचे समाधान झाले नाही. हे आंदोलन तीन तास सुरू होते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यानंतर पुराडाचे प्रभारी पोलीस अधिकारी दीपक शेळके यांनी हस्तक्षेप करीत आंदोलनाचे नेतृत्व करणारे राजेंद्रसिंह ठाकूर, सरपंच अशोक उसेंडी, उपसरपंच रामचंद्र रोकडे, युवा आघाडी प्रमुख ग्यानचंन्द्र सहारे, रामचंद्र कोडाप, पेशीलाल सोनागार, डॉ.सरिता ठलाल, पितांबर अरगदुल्ला, मंजुळा मारगाये यांना स्थानबद्ध केले.
(बॉक्स)
गेवर्धातही आंदोलन
गेवर्धा येथील चक्का जाम आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ आंदोलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष घिसु खुणे, शहर अध्यक्ष मुक्ताजी दुर्गे, माजी उपसरपंच लता सहारे, प्रल्हाद खुणे, नानाजी खुणे, संतोष सहाळा, किसनलाल साहाळा यांनी केले. कढोली येथील चक्काच जाम आंदोलनाचे नेतृत्व कढोलीचे माजी सरपंच चंद्रकांत चौके यांनी केले. यावेळी सरपंच पारिका रंधेय, उपसरपंच किरण आकरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
260821\img_20210826_164839.jpg~260821\img_20210826_164919.jpg
पूराडा येथे आंदोलन करताना राजेंद्र सिंह ठाकुर व आंदोलक~गेवर्धा येथे चक्काजाम करताना घिसू खूणे व कार्यकर्ते