सभापती पोहोचल्या ग्राम पंचायतीत

By Admin | Updated: September 5, 2015 01:38 IST2015-09-05T01:38:31+5:302015-09-05T01:38:31+5:30

अहेरी पंचायत समितीच्या सभापती रविना गावडे यांनी अचानक ग्राम पंचायत खांदला व ग्राम पंचायत राजारामला भेट ....

Chairman of Gram Panchayat reached the chair | सभापती पोहोचल्या ग्राम पंचायतीत

सभापती पोहोचल्या ग्राम पंचायतीत

राजारामला सरप्राईज व्हिजीट : योजनांची माहिती गावकऱ्यांना द्या; सचिवाला निर्देश
राजाराम : अहेरी पंचायत समितीच्या सभापती रविना गावडे यांनी अचानक ग्राम पंचायत खांदला व ग्राम पंचायत राजारामला भेट देऊन येथील विकास कामांची माहिती जाणून घेतली.
विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात ग्राम पंचायतची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे सचिवाने नागरिकांना सर्व योजनांची माहिती वेळोवेळी दिलीच पाहिजे, असे निर्देश सभापतींनी दिले. यावेळी पं. स. विस्तार अधिकारी रायपुरे, खांदला ग्रा. पं. चे उपसरपंच भगवान मडावी, रंगा आलाम, सचिव एस. सडमेक, राजारामच्या सचिव ममता गावडे आदी उपस्थित होते.

Web Title: Chairman of Gram Panchayat reached the chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.