सीईआंनी घेतला भामरागडच्या विकासकामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:46+5:302021-06-28T04:24:46+5:30
अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याच्या सूचना सर्व ग्रामसेवकांना देण्यात आल्या व १० ऑगस्ट २०२१ पर्यंत सर्व अपूर्ण घरकुल पूर्ण करून ...

सीईआंनी घेतला भामरागडच्या विकासकामांचा आढावा
अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याच्या सूचना सर्व ग्रामसेवकांना देण्यात आल्या व १० ऑगस्ट २०२१ पर्यंत सर्व अपूर्ण घरकुल पूर्ण करून घेण्यास सांगितले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम पूर्ण करण्यास सांगितले. तसेच पूर्ण केलेल्या शौचालयाची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. जल जीवन मिशन अंतर्गत नळ जोडणीचे कामे तत्काळ पूर्ण करण्यास सांगितले. नरेगाच्या कामाचा आढावा घेऊन अपूर्ण कामे पूर्ण करण्यास व मजुरांची संख्या वाढविण्याच्या सूचना केल्या. पाच टक्के अबंध निधीच्या खर्चाची तपासणी केली. ग्रामसेवक यांचे पासबुक व कॅशबूक याची पडताळणी करून पाच टक्के निधी खर्चाच्या कामाची पाहणी केली. चाैदाव्या वित्त आयोग कामाची तपासणी केली.
मानव विकास अंतर्गत बीजभांडवल खर्चाचा आढावा घेतला. ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. टाईम स्कॅन कॅमेरामधून काढलेल्या फोटोचा आढावा घेतला व कमी फोटो असलेल्या ग्रामसेवकांची दप्तर तपासणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना गट विकास अधिकाऱ्यांना दिल्या. बांधकाम विभागाचा आढावा घेऊन शाळा दुरुस्ती, अंगणवाडी बांधकाम, आदी कामांची पाहणी करून कामाचा दर्जा तपासणी करण्यास ग्रामसेवकांना सांगितले. काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. विविध विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता ताडगाव-पल्ली रोडवरील पुलाच्या कामांची पाहणी करण्यात आली. तसेच ताडगाव-पल्ली रोडचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आल्या, असे पं. स.चे गटविकास अधिकारी राहुल चव्हाण यांनी कळविले.
बाॅक्स
मन्नेराजाराम प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला आकस्मिक भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण चौधरी उपस्थित होते. दरम्यान, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच रिक्त पदांची माहिती घेतली. आशिर्वाद यांनी पूर्वमान्सून तपासणी, मलेरिया तपासणी, रुग्णांची संख्या, आदींबाबत माहिती घेतली. मलेरिया रुग्णांची काळजी घेण्यास सांगितले. मान्सून काळात गरोदर व स्तनदा मातांची मान्सून पूर्व तपासणी गरोदरमातांना माहेरघरात दाखल करून त्यांना त्या ठिकाणी सर्व सेवा देण्यास सांगितले.
गरोदर मातांची संस्थात्मक प्रसूती करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करून त्यांना माहेरघरात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. टीबी, कुष्ठरोग, इतर साथीचे रोगाचा आढावा घेऊन त्याविषयी मार्गदर्शन केले. लसीकरणाचा आढावा घेतला, तसेच माता मृत्यू व बालमृत्यू होण्याची कारणे जाणून घेतली. बालमृत्यू यांचे प्रमाण कमी करण्यासाठी अतिजोखमीच्या सर्व मातांना संदर्भ सेवा देण्यास मार्गदर्शन केले.