शतकोटी योजना : पावसाळ्यात होणार रोपट्यांची लागवड

By Admin | Updated: May 8, 2014 02:20 IST2014-05-08T01:58:28+5:302014-05-08T02:20:16+5:30

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्यावतीने महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात येते.

Century plan: Planting of seedlings in rainy season | शतकोटी योजना : पावसाळ्यात होणार रोपट्यांची लागवड

शतकोटी योजना : पावसाळ्यात होणार रोपट्यांची लागवड

९२.२१ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

गडचिरोली : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्यावतीने महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत यावर्षी सन २०१४-१५ चे जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ९२ लाख २१ हजार आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टांमध्ये वाढ झाली आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत दरवर्षी पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिल्या जाते. उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील वनविभाग, जिल्हा परिषद, एफडीसीएम, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण व इतर विभाग वृक्ष लागवड करतात.

इतर विभागांमध्ये सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, इटियाडोह धरण, पीएमजीएस, नगर परिषद व जिल्हा उद्योग केंद्र यांचा समावेश आहे. वृक्ष लागवडीसोबतच संगोपन व संवर्धनाचे जबाबदारीही त्या-त्या विभागाची आहे. यावर्षी २०१४-१५ मध्ये वनविभागाला ८० लाख, जिल्हा परिषदेला ३ लाख, एफडीसीएम ८ लाख, कृषी विभागाला ४६ हजार, सामाजिक वनीकरण ५० हजार इतर विभागाला २५ हजाराचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्टानुसार या वर्षीच्या पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभाग ७ हजार, पाटबंधारे विभाग ५ हजार, इटियाडोह धरण विभाग ३ हजार, पीएमजीएस ५ हजार, दोन्ही नगर परिषदा ४ हजार आणि जिल्हा उद्योग केंद्र १ हजार रोपट्याची लागवड करणार आहे. गतवर्षी २०१३-१४ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सर्व विभाग मिळून ८३ लाख १७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

सर्व विभागाच्या कार्यालयाच्यावतीने मिळून गतवर्षी ८६ लाख ४९ हजार ४९१ वृक्ष लागवडीची मागणी करण्यात आली होती. २०१२-१३ वर्षाचे शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ८८ लाख ५१ हजार इतके होते. गेल्या दोन वर्षाचा विचार केला असता, यंदा शंभर कोटी वृक्ष लागवड योजनेच्या वृक्ष लागवडीचे जिल्ह्याचे उद्दिष्ट वाढले असल्याचे दिसून येते. गतवर्षी म्हणजे २०१३ च्या पावसाळ्यामध्ये सर्व यंत्रणेचे विभाग मिळून जिल्हाभरात ८८ लाख ५१ हजार खड्डे खोदण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी ५३ लाख ४ हजार ३०१ खड्डे खोदण्यात आले. सर्व विभाग मिळून २ हजार ६९६ रोपवाटीका उभारण्यात आल्या. शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ७२ लाख ३४ हजार १५० सागवान वृक्ष लावण्यात आले.

गतवर्षी सर्व विभाग मिळून प्रत्यक्षात सर्व जातीचे रोपटे मिळून ९२ लाख ७२ हजार ८०५ वृक्षाची लागवड करण्यात आली. उद्दिष्टानुसार वृक्ष लागवडीची टक्केवारी १०४.७७ इतकी आहे. खोदलेल्या खड्ड्यानुसार वृक्ष लागवडीची टक्केवारी १७४.८२ इतकी आहे. यापैकी कृषी विभागाने २० हजार ७७३, एफडीसीएम ६ लाख २६ हजार ८६३, वनविभाग ७१ लाख ५६ हजार ९७६, जिल्हा परिषद व आरडीडी मिळून १३ लाख १२ हजार ५७६, सामाजिक वनीकरण विभागाने ८७ हजार २५३ रोपट्याची खड्डे खोदून प्रत्यक्षात गतवर्षी लागवड करण्यात आली होती. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Century plan: Planting of seedlings in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.