विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्द
By Admin | Updated: February 6, 2017 01:32 IST2017-02-06T01:32:53+5:302017-02-06T01:32:53+5:30
देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे. शासनाच्या वतीने अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्द
अशोक नेते यांचे आश्वासन : इंदाळा येथे बूथ मेळावा
गडचिरोली : देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे. शासनाच्या वतीने अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला मागील दोन वर्षांत गती मिळाली आहे. जिल्हा विकासासाठी केंद्र सरकार कटीबद्द आहे, असे आश्वासन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी दिले.
तालुक्यातील कोटगल-मुरखळा जि.प. क्षेत्रातील इंदाळा येथे रविवारी भारतीय जनता पार्टीतर्फे बूथ मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर आमदार डॉ. देवराव होळी, बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, आनंद श्रुंगारपवार, विलास भांडेकर, नरेंद्र भरडकर, मुक्तेश्वर काटवे, अविनाश विश्रोजवार, गिरीधर मेश्राम, पुष्पा लाडवे, प्रतिभा चौधरी, ममता दुधबावरे, अमिता मडावी, मारोतराव इचोडकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)