सीआरपीएफचा स्थापना दिवस साजरा

By Admin | Updated: July 2, 2015 02:11 IST2015-07-02T02:11:48+5:302015-07-02T02:11:48+5:30

२००९ नंतर गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीचा मुकाबला करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले.

Celebration of CRPF Day | सीआरपीएफचा स्थापना दिवस साजरा

सीआरपीएफचा स्थापना दिवस साजरा

अहेरीत कार्यक्रम : सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा उत्साहात
अहेरी : २००९ नंतर गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीचा मुकाबला करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले. अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाशेजारी ३७ सीआरपीएफ बटालियनचे मुख्यालय आहे. येथे ४८ वा स्थापना दिवस १ जुलै रोजी साजरा करण्यात आला.
यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक (परिसंचालन) संजय लाटकर, ३७ बटालियनचे कमांडंट अरूणकुमार मीना, ९ बटालियनचे कमांडंट राजेंद्र प्रसाद उपस्थित होते. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या विभाग योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. या ठिकाणी कर्मचारी, नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्थापना दिनाच्या निमित्ताने एक मिनिट ड्रिल, बिंदी गेम, बॉल थ्री चॉन्स आदी गेम खेळण्यात आले. याशिवाय व्हॉलीबॉल सामन्यांचेही आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व स्रेहभोज कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.
यावेळी सीआरपीएफचे जवान व अहेरी पोलीस दलाचे अधिकारी, जवान उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी ३७ बटालियनच्या स्थापनेची माहिती विषद केली.

Web Title: Celebration of CRPF Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.