गीता पाठशाळेत विश्वशांती दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:33 IST2021-01-22T04:33:23+5:302021-01-22T04:33:23+5:30

कुरखेडा : प्रजापिता ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कुरखेडा गीता पाठशाळेत प्रजापिता ब्रह्माबाबा यांचा स्मृतिदिवस १८ जानेवारीला विश्वशांती दिवस म्हणून ...

Celebrate World Peace Day at Gita School | गीता पाठशाळेत विश्वशांती दिवस साजरा

गीता पाठशाळेत विश्वशांती दिवस साजरा

कुरखेडा : प्रजापिता ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कुरखेडा गीता पाठशाळेत प्रजापिता ब्रह्माबाबा यांचा स्मृतिदिवस १८ जानेवारीला विश्वशांती दिवस म्हणून साजरा करण्यात आला. विश्वकल्याणासाठी ब्रह्माबाबांनी तऩ,मन,धन समर्पीत केले. स्वत:ला आत्मा समजून परम्यात्म्याला स्मरण करा. पिता, शिक्षक, सतगुरू बनून परमेश्वर स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तनाचा मूलमंत्र देत आहे, असे मनाेगत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी शेषराव तलमले, गोवर्धन गहाणे, लीलाधर कावळे यांनी अनुभव सांगितले. विशेष म्हणजे, कुरखेडा, पुराडा, मालेवाडा, रामगड, शिरपूर, गोठणगाव, कोरची येथील ब्रह्मवत्सांनी ब्रह्माबाबांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी ईश्वरीय प्रसाद वाटण्यात आला. सामूहिक राजयोग करून स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा शेवट झाला. यशस्वीतेसाठी लीलाधर मडावी, छगऩ आडिल, खुशाल मोहुर्ले, भाऊराव बानबले, आशा बानबले, लता डोंगरवार यांनी सहकार्य केले.

Web Title: Celebrate World Peace Day at Gita School