घरीच नमाज पठण करून रमजान हाेता साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:36 IST2021-04-25T04:36:29+5:302021-04-25T04:36:29+5:30
गतवर्षी लॉकडाऊनमध्ये मुस्लिमबांधवांनी आपल्या घरातूनच रमजान साजरा केला. तसेच यावर्षीसुद्धा रमजान महिना घरीच नमाज पठण करून साजरा केला ...

घरीच नमाज पठण करून रमजान हाेता साजरा
गतवर्षी लॉकडाऊनमध्ये मुस्लिमबांधवांनी आपल्या घरातूनच रमजान साजरा केला. तसेच यावर्षीसुद्धा रमजान महिना घरीच नमाज पठण करून साजरा केला जात आहे.
पवित्र रमजान महिन्यात पहाटे ४.४५ वाजता म्हणजेच सूर्योदयापूर्वी रोजा ठेवला जातो. त्यानंतर दिवसभर काहीही न खाता-पिता अल्लाहची उपासना केली जाते. मुस्लिम धर्माचे पवित्र धर्मग्रंथ कुराण शरीफचे पठण करणे, दिवसातून पाचवेळा नमाज पडणे. सूर्यास्ताच्या वेळी रोजा अल्लाहच्या साक्षीने पेंडखजूरने सोडणे, ईशाच्या नमाजनंतर तराबीच्या नमाजाची तयारी करणे, तराबी नमाजमध्ये पवित्र धर्मग्रंथाचे पठण करणे यासारखा दिनक्रम असताे; परंतु सध्या देशात कोरोना महामारीचे संकट असल्याने सर्व मुस्लिम बांधव आपल्या घरीच नमाज पठण करून प्रशासनास सहकार्य करीत आहेत. आपापल्या घरी पाचवेळा नमाज रोजे तिलावत करून चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत उत्साहाचे व नवचैतन्य वातावरण दिसून येत आहे.
===Photopath===
240421\24gad_10_24042021_30.jpg
===Caption===
नमाज अता करताना मुस्लिम कुटुंब.