मार्र्कं डा यात्रेकरूंवर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

By Admin | Updated: March 6, 2016 00:55 IST2016-03-06T00:55:50+5:302016-03-06T00:55:50+5:30

जिल्हा व तालुका प्रशासनाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कं डानगरीत भरणाऱ्या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून या यात्रेत भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा देण्यात येणार आहेत.

CCTV cameras will remain on Marracks | मार्र्कं डा यात्रेकरूंवर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

मार्र्कं डा यात्रेकरूंवर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

यात्रेची तयारी पूर्ण : पोर्टेबल लाईट व्यवस्थेने मार्र्कं डानगरी प्रकाशणार
चामोर्शी : जिल्हा व तालुका प्रशासनाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कं डानगरीत भरणाऱ्या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून या यात्रेत भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. वैनगंगा नदीघाटावर पोर्टेबल लाईटची व्यवस्था राहणार असल्याने यात्राकाळात मार्र्कंडानगरी प्रकाशमान होणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच मार्र्कं डानगरीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली असल्याने यात्रेकरूंवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची २४ तास करडी नजर राहणार आहे.

मार्र्कंडा यात्रेदरम्यान वैनगंगा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बोट, लायबाइ, लाईफ जॉकेट, अग्निशमन यंत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. १ किमी अंतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्च लाईट मेगाफोन्सचीही व्यवस्था करण्यात येणार असून सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी प्रथमच स्नानगृह व नावाड्यांना जॉकेट, लायबाइची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी व चामोर्शीचे तहसीलदार यू. जी. वैद्य यांनी दिली आहे.
पोलीस विभागाच्या वतीने ३५० पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच १५० गृहरक्षक सुरक्षाव्यवस्थेसाठी तैनात राहणार असून नियंत्रणाकरिता मार्र्कंडानगरीत नऊ पोलीस चौक्या उभारण्यात येणार आहे. संपूर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मुख्य नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय श्वान पथक, घातपात विरोधी पथक, बीडीडीएस पथक, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर तपासणी कामासाठी राहणार आहे. अपघात टाळण्यासाठी यात्राकाळात मार्र्कं डानगरीत वाहने फिरवू नयेत, असे आवाहन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शीचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी केले आहे.
मार्र्कंडा यात्रेदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत असून सदर यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: CCTV cameras will remain on Marracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.