वडसा रेल्वे स्थानकावर लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 01:53 IST2016-02-26T01:53:28+5:302016-02-26T01:53:28+5:30

चांदाफोर्ट-गोंदियादरम्यान वडसा हे महत्त्वाचे रेल्वेस्थानक असून येथील परिसरात व स्थानकावर सीसीटीव्ही...

CCTV cameras will be required at Wadsa railway station | वडसा रेल्वे स्थानकावर लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

वडसा रेल्वे स्थानकावर लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

स्वयंचलित तिकीट विक्रय मशीन लावणार
देसाईगंज : चांदाफोर्ट-गोंदियादरम्यान वडसा हे महत्त्वाचे रेल्वेस्थानक असून येथील परिसरात व स्थानकावर सीसीटीव्ही व स्वयंचलित तिकीट विक्रय मशीन लावण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वाणिज्य निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली आहे. मागील दोन वर्षापासून रेल्वे सल्लागार समितीने या मागण्यांसाठी पाठपुरावा चालविला होता. याबाबत मंडल रेल्वे प्रबंधक (वाणिज्य) तन्मय मुखोपाध्याय यांच्याकडेही निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आता वडसा रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच स्वयंचलीत तिकीट विक्रय मशीन लावण्याचा निर्णय झाला. याबाबत ९ फेब्रुवारी २०१६ व १६ फेब्रुवारी २०१६ ला अधिसूचना जारी करण्यात आली, अशी माहिती वाणिज्य निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. विष्णू वैरागडे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: CCTV cameras will be required at Wadsa railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.