नरोटीतील दारू विक्रेत्यांवर धाड
By Admin | Updated: May 18, 2017 01:48 IST2017-05-18T01:48:58+5:302017-05-18T01:48:58+5:30
वैरागड परिसरातील नरोटी चक येथील दारू विक्रेत्यांच्या घरी आरमोरी पोलिसांनी रविवारी धाड टाकून अवैध दारू जप्त केली आहे.

नरोटीतील दारू विक्रेत्यांवर धाड
दोघांना अटक : आरमोरी पोलिसांची धडक मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वैरागड परिसरातील नरोटी चक येथील दारू विक्रेत्यांच्या घरी आरमोरी पोलिसांनी रविवारी धाड टाकून अवैध दारू जप्त केली आहे.
आरमोरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये दारूबंदी असतानाही नरोटी चक येथील काही व्यक्ती दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आरमोरीचे पोलीस निरिक्षक महेश पाटील यांना प्राप्त झाली. त्यानुसार आरमोरी पोलिसांनी नरोटी चक येथील कुसन पोटावी व रसुला पोटावी यांच्या घराची झडती घेऊन दारू जप्त केली. लगतच्या कुकडी गावातीलही दारू विक्रेत्यांवर धाड टाकली. मुक्तीपथ अभियानांतर्गत दारू, खर्रा, धुम्रपान व्यसन आदी बाबत पोलीस स्टेशनच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने अनेक गावांमध्ये दारूबंदीची कडक अंमलबजावणी झाली असताना काही नागरिक मात्र दारू विक्री करून गावातील शांतता धोक्यात आणत आहेत. अशा नागरिकांच्या विरोधात ठोस पाऊल उचलले जाण्याचा इशारा ठाणेदार महेश पाटील यांनी दिला आहे. गावातील नागरिकांकडून अवैध दारू विक्रीबाबतची माहिती मिळताच पोलीस धाड टाकून दारू जप्त करीत आहेत. त्याचबरोबर दारू विक्रेत्यांना अटक करीत आहेत. त्यामुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.