बलात्कारप्रकरणी बाजार समितीच्या लिपिकावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 18, 2015 01:43 IST2015-05-18T01:43:30+5:302015-05-18T01:43:30+5:30
गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीत लिपीक पदावर कार्यरत असलेल्या कनेरी पारडी येथील लंकेश नेताजी लोंढे याच्यावर गडचिरोली पोलीस ठाण्यात

बलात्कारप्रकरणी बाजार समितीच्या लिपिकावर गुन्हा दाखल
गडचिरोली : गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीत लिपीक पदावर कार्यरत असलेल्या कनेरी पारडी येथील लंकेश नेताजी लोंढे याच्यावर गडचिरोली पोलीस ठाण्यात महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार केल्या प्रकरणी शनिवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा मुलीच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी पारडी (कनेरी) येथील लंकेश नेताजी लोंढे (२८) याच्यावर भादंविचे कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सदर आरोपी युवक फरार आहे. २००८ पासून पीडित युवती व लोंढे याच्यात प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.