शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

‘त्या’ दाेन रुग्णालयांच्या संचालकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 05:00 IST

कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याच्या परवानाबाबतीत विचारणा केली असता कोणताही परवाना नसल्याचे दाेन्ही रुग्णालयांच्या संचालकांनी सांगीतले. त्यावरून त्याच दिवशी या दाेन्ही रुग्णालयांना सील ठाेकण्यात आले हाेते. चाैकशीत आराेप सिद्ध झाल्याने दाेन्ही रुग्णालयांविराेधात तहसीलदार संताेष महल्ले यांनी देसाईगंज पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

ठळक मुद्देकाेराेना रुग्णांवर उपचार करणे भाेवले, देसाईगंज तहसीलदारांनी केली तक्रार

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : काेराेना रुग्णांवर उपचार करण्याची काेणतीही परवानगी नसताना त्यांच्यावर अवैधरीत्या उपचार करणाऱ्या देसाईगंज शहरातील आशा क्लिनिक व डाॅ. बुद्धे हाॅस्पिटल या दाेन रुग्णालयांना २ मे राेजी प्रशासनाने सील ठाेकले हाेते. या प्रकरणाची चाैकशी केल्यानंतर आशा क्लिनिकचे संचालक डाॅ. श्रीकांत रामजी बन्साेेड व डाॅ. बुद्धे हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. मनाेज मुरलीधर बुद्धे यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाईगंज नगर परिषद हद्दीत अनाधिकृत कोविड रुग्णालय चालवित असल्याच्या गोपनीय माहितीवरून डॉ. मनोज बुद्धे यांच्या आशा क्लिनिक व गांधी वॉर्डातील  डॉ. श्रीकांत बन्सोड यांच्या हॉस्पिटलची २ मे राेजी तपासणी केली असता दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच रुग्ण कोविड आजाराचा उपचार घेत असल्याचे आढळून आले. कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याच्या परवानाबाबतीत विचारणा केली असता कोणताही परवाना नसल्याचे दाेन्ही रुग्णालयांच्या संचालकांनी सांगीतले. त्यावरून त्याच दिवशी या दाेन्ही रुग्णालयांना सील ठाेकण्यात आले हाेते. चाैकशीत आराेप सिद्ध झाल्याने दाेन्ही रुग्णालयांविराेधात तहसीलदार संताेष महल्ले यांनी देसाईगंज पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून डॉ. मनोज बुद्धे  व डॉ. श्रीकांत बन्सोड यांच्या विराेधात भादंवि कलम १८८, २७९, २८० सहकलम ५१(ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, सहकलम २,३ व ४, साथरोग अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक सोनम नाईक पुढील तपास करीत आहेत. कारवाई झालेल्या दाेन्ही दवाखान्यांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉंसेंट्रेटर, ऑक्सिजन मॉनिटर, ऑक्सिमीटर, फॅबिफ्यु  गोळ्या, डॉक्झिसाक्लिन  गोळ्या, ऑस्पिरिन  गोळ्या, इव्हरमेक्टीन  गोळ्या, ए हिस्ट -मोस्ट  गोळ्या, अझीथ्रोमॉसिन  गोळ्या, व्हिटॅमिन सी गोळ्या आढळून आल्या. एवढा माेठा साठा काेणत्या मेडिकलमधून आणण्यात आला, याचीही चाैकशी करण्याची मागणी देसाईगंजातील नागरिकांकडून हाेत आहे. 

अहेरीतील रुग्णालयाला ठाेकले सीलअहेरी : येथील डाॅ. अमाेल पेशेट्टीवार यांच्या दवाखान्यात काेराेना रुग्णांवर अवैधरीत्या उपचार सुरू असल्याचे आढळून आल्याने या रुग्णालयाला प्रशासनाने सील ठाेकले आहे. काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात प्रशासनाची काेणतीही परवानगी घेतली नसतानाही डाॅ. अमाेल पेशेट्टीवार हे काेराेना रुग्णांवर उपचार करीत असल्याची गाेपनीय माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. त्यानुसार अहेरी तालुका कोविड सनियंत्रण समितीने रुग्णालयाची तपासणी केली असता, तेथे एकूण सहा रुग्ण भरती असल्याचे आढळून आले. त्यांतील एक रुग्ण काेराेनाबाधित हाेता. त्यानुसार रुग्णालयाला सील ठाेकण्यात आली आहे. अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, अहेरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वानखेडे, अहेरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय साळवे, अहेरी मंडल अधिकारी एकनाथ चांदेकर, तलाठी कौसर पठाण, रोशन दरडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या