पुन्हा डाेके वर काढताेय काेराेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:46 IST2021-07-07T04:46:05+5:302021-07-07T04:46:05+5:30
लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यापासून बाजारपेठेत गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. लग्न व इतर कार्यक्रमांचेही आयाेजन केले जात आहे. माेर्चे, आंदाेलने ...

पुन्हा डाेके वर काढताेय काेराेना
लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यापासून बाजारपेठेत गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. लग्न व इतर कार्यक्रमांचेही आयाेजन केले जात आहे. माेर्चे, आंदाेलने केली जात आहेत. याचा परिणाम म्हणजे मागील तीन दिवसांपासून सतत नवीन काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. भविष्यासाठी ही धाेक्याची घंटा ठरू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंगळवारी जिल्ह्यात २४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच १८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण काेराेनाबाधितांची संख्या ३० हजार ३५० एवढी झाली आहे. त्यापैकी २९ हजार ४७२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या १३७ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७४१ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन २४ बाधितांमध्ये चामोर्शी तालुक्यातील ४, धानोरा तालुक्यातील १२, कोरची
तालुक्यातील १, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये ५, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये २ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त
झालेल्या १८ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ४, अहेरी १, आरमोरी १, चामोर्शी ६, एटापल्ली १, मुलचेरा ५ यांचा समावेश आहे.