औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत १४० जणांची काेराेना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST2021-01-17T04:31:43+5:302021-01-17T04:31:43+5:30
गडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कोरोना व रक्त तपासणी शिबिर गुरुवारी घेण्यात आले. ...

औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत १४० जणांची काेराेना चाचणी
गडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कोरोना व रक्त तपासणी शिबिर गुरुवारी घेण्यात आले. या शिबिरात संस्थेतील प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात ११६ जणांची रक्त तपासणी, सिकलसेल, थाॕयराॅईड, सीबीसी एचबी तसेच १४० जणांची मोफत (आरटीपीसीआर) कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर तपासणी रिपोर्ट त्याच दिवशी देण्यात आले. संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांच्या मार्गदर्शनात मोफत शिबिर घेण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंत्रज्ञ दीक्षा दरडे, भाग्यश्री मसराम, डीईओ विकास राऊत आदी कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम, सहकार्यक्रम अधिकारी सचिन बोंद्रे, गटनिदेशक मधू पवार, निदेशक विनायक मुरकुटे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.