भरधाव कारच्या धडकेत वनरक्षक ठार

By Admin | Updated: December 21, 2014 22:58 IST2014-12-21T22:58:59+5:302014-12-21T22:58:59+5:30

नागपूरवरून आरमोरीमार्गे गडचिरोलीकडे येणाऱ्या भरधाव कारने गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील एकजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना

Carcasses killed in a car crash | भरधाव कारच्या धडकेत वनरक्षक ठार

भरधाव कारच्या धडकेत वनरक्षक ठार

आरमोरी : नागपूरवरून आरमोरीमार्गे गडचिरोलीकडे येणाऱ्या भरधाव कारने गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील एकजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना किटाळी-देऊळगाव दरम्यान रविवारला ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ठार झालेल्या वनरक्षकाचे नाव अभय देवाजी डोंगरवार (३४) रा. पारडी असे आहे. तर योगेश पांडुरंग भोयर (१९) हा गंभीर जखमी झाला.
प्राप्त माहितीनुसार वनरक्षक अभय डोंगरवार व त्यांचा साळा योगेश भोयर हे दोघेही जण नव्या दुचाकीने सिलींडर घेऊन गडचिरोलीवरून आरमोरीकडे जात होते. दरम्यान आरमोरीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ४९-१३४० या कारने किटाळीनजीक समोरून जबर धडक दिली. यात डोंगरवार व भोयर हे दोघेही गंभीर जखमी झाले. या जखमींना कारमालक बबीता प्रदीप बोरीकर रा. नागपूर यांनी स्वत:च्या वाहनाने आरमोरीच्या ग्रामीण रूग्णालयात हलविले. दरम्यान प्रकृती अधिक गंभीर झाल्याने उपचारादरम्यान वनरक्षक अभय डोंगरवार यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेला योगेश भोयर याला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघात घडताच कारचालक अमोल जयंत बोरकर (२४) रा. गिट्टीखदान नागपूर हा कार घटनास्थळी ठेवून पसार झाला. या अपघातात कार व दुचाकी प्रचंड क्षतिग्रस्त झाले. आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून कार ताब्यात घेतली. कारचालक अमोल बोरकर याच्याविरूध्दात भादंविचे कलम २८९, ३३८, ३०४ अ व मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बच्चलवार करीत आहेत. गडचिरोली-आरमोरी मार्गावर अनेक वळण असल्याने सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Carcasses killed in a car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.