नरभक्षक वाघिणीला नागपुरातील गोरेवाड्याला पाठविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:29 IST2017-08-14T00:28:24+5:302017-08-14T00:29:05+5:30
दोन नागरिकांसह चार पाळीव जनावरांचा बळी घेतलेल्या नरभक्षक वाघिणीला आरमोरी तालुक्यात रवी-अरसोडा दरम्यानच्या जंगल परिसरात.....

नरभक्षक वाघिणीला नागपुरातील गोरेवाड्याला पाठविले
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : दोन नागरिकांसह चार पाळीव जनावरांचा बळी घेतलेल्या नरभक्षक वाघिणीला आरमोरी तालुक्यात रवी-अरसोडा दरम्यानच्या जंगल परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शॉर्पशुटर व वन विभागाच्या चमूने जेरबंद केले. या नरभक्षक वाघिणीला नागपूर येथील गोरेवाडा रिसोर्स सेंटर येथे रविवारी पाठविण्यात आले. नरभक्षक वाघीण जेरबंद झाल्याने देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आरमोरी तालुक्यातील रवी, अरसोडा जंगल परिसरात तसेच देसाईगंज तालुक्याच्या कुरूड कोंढाळा भागात गेल्या सहा महिन्यांपासून वाघिणीची दहशत कायम होती. त्यामुळे या भागातील नागरिक भितीमुळे सायंकाळी व पहाटेच्या सुमारास बाहेर पडत नव्हते. वाघाच्या दहशतीमुळे या भागातील शेती मशागतीची कामे प्रभावित झाली होती. शॉर्पशुटर दोनदा बोलविण्यात आले. मात्र वाघिण सापडली नाही. त्यानंतर पुन्हा तिसºयांदा वन विभागाने शॉर्पशुटरची चमू बोलाविली. दरम्यान चमूने शर्थीचे प्रयत्न करून नरभक्षक वाघिणीला शनिवारी जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
फुटेज पाहून झाली ओळख
वनाधिकाºयांनी दुपारच्या सुमारास या वाघिणीला पिंजºयामध्ये कैद करून नागपूर येथील गोरेवाडा सेंटरमध्ये घेऊन गेले. यावेळी वनाधिकारी चौडीकार, नरेंद्र चांदेकर, क्षेत्र सहायक मेनेवार, ठाकरे व दोन वनमजूर उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून ज्या ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या. त्या ठिकाणचे निरिक्षण करण्यात आले. घटनास्थळाजवळ लावण्यात आलेले कॅमेराचे फुटेजही पाहण्यात आले. याच वाघिणीने तीन लोकांवर हल्ला केला, असे वडसाचे आरएफओ नरेंद्र चांदेकर यांनी सांगितले. सदर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन कर्मचाºयांचेही मोलाचे सहकार्य लाभले.