वनविभागातील गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांची
By Admin | Updated: May 7, 2014 02:13 IST2014-05-07T02:13:04+5:302014-05-07T02:13:04+5:30
वनविभागातील गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांची

वनविभागातील गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांची
: वनरक्षकांच्या ३७ पदांकरिता ११,५४७ उमेदवार मैदानात भरतीसाठी उमेदवारांचे जत्थे दाखल
गडचिरोली/देसाईगंज/आलापल्ली : वनविभागातील गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे़ वनरक्षकाच्या ३७ पदासाठी ११ हजार ५४७ उमेदवार पात्र ठरले आहेत़ शारीरिक पात्रतेची कस काढण्यासाठी गोंदिया, भंडारा, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर जिल्ह्यातील तरूणांनी गडचिरोली, देसाईगंज व आलापल्ली येथे गर्दी केली असून युवकांचे जत्थे जिल्ह्यात दाखल झाले आहे. वनरक्षकाच्या भरती प्रक्रियेत शारीरिक पात्रतेचे निकष पूर्ण करण्यासाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षेकरीता लगतच्या जिल्ह्यातील युवक देसाईगंज, गडचिरोली व आलापल्ली येथे आले आहेत. गडचिरोली वनवृत्तासाठी जिल्ह्यात वनरक्षकांच्या ३७ पदासाठी भरती होत आहे. मात्र या पदासाठी ११ हजार ५४७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही प्रक्रियापूर्णपणे आॅनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे़ देसाईगंज व गडचिरोली येथे ६ ते १० मे पर्यंत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
तर आलापल्ली येथे ६ ते ७ मे दरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात येईल़ एकुण अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी ४ हजार ६९२ उमेदवारांची शारीरिक पात्रता परीक्षा वडसा वनविभागांतर्गत घेण्यात येईल़ उमेदवारांना सोयीचे होण्याच्या दृष्टीने जिल्हानिहाय उमेदवारांचे दिवस ठरविण्यात आले आहेत़ ५ दिवस चालणार्या भरती प्रक्रियेसाठी वनविभागाने पोलीस प्रशासनाची देखील मदत घेतली आहे़ ५ दिवस चालणार्या भरती प्रक्रियेत वडसा वनविभागाने उन्हाचा तडाखा पाहून उमेदवारांच्या सोयीकरीता पाणी, सावलीसाठी मंडपाची व्यवस्था केली आहे़
गडचिरोली व आलापल्ली येथेही भरतीसाठी वनविभागाने जय्यत तयारी केली आहे. आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) उमेदवारांची दमछाक; अनेक उमेदवार वंचित ४देसाईगंज रेल्वे व बस स्थानकापासून वनविभागाच्या पदभरती प्रक्रियेचे ठिकाण जवळपास ४ किमी अतंरावर आहे़ शहरात अंतर्गत वाहतूकीसाठी आॅटोची सोय नाही़ त्यामुळे बाहेरगावावरून येणार्या उमेदवारांनी शारीरीक परीक्षेपुर्वीच ठिकाणावर पोहचण्यासाठी क्षमता सिध्द करावी लागत आहे़ ४वनविभागाने भरतीसाठी आॅनलाईन अर्ज मागविले. ४ मे रोजी शासकीय सुटी आल्याने अनेक उमेदवारांना अर्ज करता आले नाही. यामुळे वेळेअभावी उमेदवारांना वंचित राहावे लागले.