जोगीसाखरात कर्करोग जनजागृती

By Admin | Updated: May 10, 2015 01:19 IST2015-05-10T01:19:33+5:302015-05-10T01:19:33+5:30

समूहसाधन केंद्र जोगीसाखरा येथे बुधवारी कर्करोग जनजागृती करण्याकरिता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

Cancer awareness in Jogisakhara | जोगीसाखरात कर्करोग जनजागृती

जोगीसाखरात कर्करोग जनजागृती


आरमोरी : समूहसाधन केंद्र जोगीसाखरा येथे बुधवारी कर्करोग जनजागृती करण्याकरिता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रातील ६० शिक्षक सहभागी झाले. विद्यार्थी व पालकांमध्ये कर्करोगाच्या दुष्परिणामांची माहिती पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाला केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार, पंकज वैष्णव, दिनेश तुमसरे, पळसगावचे मुख्याध्यापक आर. बी. मेश्राम, एस. आर. फरकाटे, आर. बी. धोटे उपस्थित होते. जीवन अनमोल असून जीवनातील आनंद सामाजिक बांधिलकी जोपासून घ्यावा. देशात जवळपास ३० लाख लोक कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे तंबाखू, गुटखा, दारू, मादक द्रव्य, चायनीज फुड, ब्रेड यासारख्या वस्तू टाळाव्यात असे आवाहन पंकज वैष्णव यांनी केले. पाच मिनीटांपेक्षा अधिक काळ ब्रशने दात घासणाऱ्या व्यक्तींनाही तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. हृदयाचा कॅन्सर धूम्रपानामुळे होतो. प्रदूषणामुळेही कॅन्सरची शक्यता अधिक असते. ४४ टक्केहून अधिक तापमानामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे मादक पदार्थ, द्रव्य व अन्य उत्तेजक पदार्थांचे सेवन टाळावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. नियमित व्यायाम करून शुभचिंतन करावे व नागरिकांना याकरिता प्रवृत्त करावे, असे मार्गदर्शन शिक्षकांना कार्यशाळेत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू वडपल्लीवार यांनी केले. कर्करोग व रोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Cancer awareness in Jogisakhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.