मेडिगट्टा प्रकल्पाचे काम रद्द करून जनसुनावणी घ्या
By Admin | Updated: May 3, 2016 01:51 IST2016-05-03T01:51:54+5:302016-05-03T01:51:54+5:30
तेलंगणा सरकारच्या वतीने होणाऱ्या मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील

मेडिगट्टा प्रकल्पाचे काम रद्द करून जनसुनावणी घ्या
सिरोंचा : तेलंगणा सरकारच्या वतीने होणाऱ्या मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला कोणताही फायदा होणार नसून उलट २२ गावे बुडीत क्षेत्रात जाणार आहे. त्यामुळे सदर सिंचन प्रकल्पाचे काम तत्काळ रद्द करून या संदर्भात जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघाच्या तालुका शाखा सिरोंचाच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
दरम्यान तेलंगणा सरकारच्या वतीने सदर सिंचन प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमास आविसंने सोमवारी प्रखर विरोध केला. काळे झेंडे दाखवून दोन्ही राज्याच्या सरकारचा निषेध केला. तहसीलदारांना निवेदन देताना माजी आमदार दीपक आत्राम, जि.प.चे कृषी सभापती अजय कंकडालवार, मंदा शंकर, बानय्या जनगम, रवी सल्लम, उपसरपंच कुमरी सडवल्ली, जानकी सिनू, रवी बोगोनी, लगा सत्यम, गादे सोमय्या, दिलीप गंजीवार, संतोष तलांडे, रवी सुलतान व आविसंचे कार्यकर्ते उपस्थित होते.