शिक्षणाधिकाऱ्यांची बदली रद्द करा

By Admin | Updated: July 4, 2015 02:25 IST2015-07-04T02:25:51+5:302015-07-04T02:25:51+5:30

गडचिरोली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड यांचे स्थानांतरण रद्द करण्यात यावे, ...

Cancel the transfer of education officials | शिक्षणाधिकाऱ्यांची बदली रद्द करा

शिक्षणाधिकाऱ्यांची बदली रद्द करा

पालकमंत्र्यांना साकडे : शिवसेना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व केंद्र प्रमुख संघटनेचे निवेदन
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड यांचे स्थानांतरण रद्द करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व केंद्र प्रमुख संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. नरड यांचा कार्यकाळ पूर्ण न होताच त्यांची लातूर येथे बदली करण्यात आली. जिल्ह्यातीलच रहिवासी असल्याने त्यांनी या भागातील शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न केलेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी जि.प. बांधकाम सभापती छाया कुंभारे, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, राजू कावळे, वासुदेव शेडमाके, विजय श्रुंगारपवार, जि.प. सदस्य सुनंदा आतला, नरेंद्र कुमरे, संतोष मारगोनवार आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देऊन शिक्षणाधिकारी नरड यांचे स्थानांतरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रांतीय अध्यक्ष शेमदेव चापले, जिल्हाकार्यवाह अजय लोंढे, सहकार्यवाह सुरेंद्र मामीडवार, जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र भोयर आदी उपस्थित होते. केंद्र प्रमुख संघटनेच्या वतीनेही शिक्षणाधिकारी नरड यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली. त्यांच्या बदलीमुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासावर परिणाम होईल, असे महाराष्ट्र प्रदेश केंद्र प्रमुख संघ गडचिरोलीचे अध्यक्ष गौतम मेश्राम, सरचिटणीस दिलीप मुपीडवार, कार्याध्यक्ष बोरकर, उपाध्यक्ष ताराम, महिला उपाध्यक्ष लता चौधरी यांनी म्हटले आहे. बदली रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Cancel the transfer of education officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.