शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडाची स्वयंसेवी संस्था पुरविणार रोजगार

By admin | Updated: February 26, 2017 01:50 IST

कॅनडा येथील युनायटेड स्टील वर्कर फाऊंडेशनच्या वतीने कमलापूर परिसरातील गावातील नागरिकांना रोजगाराची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

कोडसेलगुडम गावाला भेट : वनांवर आधारित कुटिरोद्योग सुरू करणार कमलापूर : कॅनडा येथील युनायटेड स्टील वर्कर फाऊंडेशनच्या वतीने कमलापूर परिसरातील गावातील नागरिकांना रोजगाराची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या अनुषंगाने संस्थेचे संचालक डग अलथाईस व पदाधिकाऱ्यांनी कोडसेलगुडमला नुकतीच भेट दिली. कोडसेलगुडम या गावातील सांबया करपेत, बापू आत्राम, सत्यनारायण कोडापे यांनी बिरसा मुंडा युवक मंडळ स्थापन केले. या मंडळाच्या वतीने या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात होत्या. त्याचबरोबर आदिवासी व बहुजन समाजाच्या नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याचेही काम केले होते. त्यांचे काम बघण्यासाठी कॅनडा येथील युनायटेड स्टिल वर्कर फाऊंडेशनचे संचालक डग अलथाईस, एसएफएच फाऊंडेशनचे बौब, मंजीत सिद्धू, डग शिंगर, रॉबिन सैनी, दादाराव डोंगरे, दिल्लीचे राजीव शर्मा, शृती राणे, जोगेंद्र सोंडुले, जोगेंद्र त्रिपाठी यांनी कोडसेलगुडम या गावाला भेट दिली. गावकऱ्यांनी विदेशी पाहुण्यांचे पारंपरिकरितीने स्वागत केले. कोळसेलगुडम येथील बिरसा मुंडा चौकात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. कोडसेलगुडम या गावाने दारूबंदीचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे डग सिंगर यांनी स्वागत केले. दारूबंदीची चळवळ संपूर्ण कमलापूर परिसरात राबविण्यासाठी आपली संस्था मदत करेल, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर सभेत उपस्थित असलेल्या नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. स्थानिक मजुरांकडे जॉबकार्ड असूनही रोजगार नसल्याची बाब स्थानिक नागरिकांनी लक्षात आणून दिली असता, वनावर आधारित लहान उद्योग उभारून रोजगार पुरविल्या जाईल, त्याचबरोबर महिलांना सिलाई मशीन उपलब्ध करून देऊन घरबसल्यास रोजगार दिला जाईल, असे आश्वासन दिले. प्रास्ताविक सांबया करपेत, संचालन बापू आत्राम तर आभार संतोष सिडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी मलय्या साकटी, स्नेहदीप आत्राम, शंकर कुसराम, श्रीनिवास पेंदाम, गणेश सिडाम, निलीमा करपेत, सीताबाई आलाम, सुलभा सिडाम, सुशिला आलाम, सुजाता सिडाम, शंकर आत्राम, संतोष पोरतेट, बंडू सिडाम यांच्यासह कोडसेलगुडम येथील नागरिकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)