घरकुल कामाला गती येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:35 IST2019-02-25T22:34:42+5:302019-02-25T22:35:03+5:30
राज्याच्या आदिवासी विकास विभागाने सर्वसामान्य आदिवासी कुटुंबासाठी शबरी आवास योजना सुरू केली, मात्र सदर योजनेअंतर्गत मंजूर केलेले मागील दोन वर्षातील शेकडो घरकुल अपूर्ण स्थितीत आहेत. चालू वर्षातील मंजूर घरकुलांच्या कामांना गती नसल्याचे दिसून येते.

घरकुल कामाला गती येईना
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाने सर्वसामान्य आदिवासी कुटुंबासाठी शबरी आवास योजना सुरू केली, मात्र सदर योजनेअंतर्गत मंजूर केलेले मागील दोन वर्षातील शेकडो घरकुल अपूर्ण स्थितीत आहेत. चालू वर्षातील मंजूर घरकुलांच्या कामांना गती नसल्याचे दिसून येते.
आदिवासी विभागाच्या अहेरी, भामरागड, गडचिरोली या तिनही प्रकल्पाअंतर्गत १२ तालुक्यात सदर योजनेअंतर्गत घरकूल मंजूर केले जातात. या घरकूल कामाचा आढावा व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे आहे. सन २०१६-१७ मध्ये शबरी आदिवासी घरकूल योजनेअंतर्गत १२ तालुक्यात एकूण ७९७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले. तेवढेच घरकूल मंजूरही करण्यात आले. यापैकी घरकुलाचे काम पूर्ण केलेल्या ४३४ लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली आहे. ६८८ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली आहे. सन २०१६-१७ या वर्षात एकूण ४६६ घरकुलाचे काम पूर्ण झाले असून पूर्ण झालेल्या कामांची सरासरी टक्केवारी ५८.४७ आहे.
सन २०१७-१८ या वर्षात सदर योजनेअंतर्गत एकूण ३०५ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ३०४ घरकुलांना आॅनलाईन मंजुरी प्रदान करण्यात आली. ३०४ पैकी आतापर्यंत केवळ ५७ घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. ७९ घरकूल लाभार्थ्यांना चौथ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली आहे. सन २०१८-१९ या चालू वर्षात एकूण ३०५ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट असून २६४ घरकुलांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यापैकी १०७ घरकुलांना आॅनलाईन मंजुरी दिली आहे. कागदपत्रे व बँक खाते उघडणाºया २० लाभार्थ्यांना घरकुलाचे काम सुरू करण्यासाठी पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली.