हत्तीरोग दुरीकरण मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:01 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:01:06+5:30
अहेरी : येथील उपजिल्हा रूग्णालयात सकाळी १० वाजता जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. लाल फित कापून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वत: गोळ्या खाऊन या मोहिमेची सुरूवात केली. दरम्यान उपजिल्हा रूग्णालयातील अनेक रूग्णांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. अनंत जाधव, डॉ. विशाल येर्रावार, सुधाकर तिम्मा, शिवराम पुल्लुरी, प्रशांत गोडसेलवार, राकेश सडमेक तसेच उपजिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

हत्तीरोग दुरीकरण मोहीम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ सोमवारी जिल्ह्यात करण्यात आला. ठिकठिकाणी पाच वर्षावरील बालके व नागरिकांना गोळ्यांचे वितरण करण्यात आले. तसेच सर्वांनी गोळ्या खाण्याचेही आवाहन याप्रसंगी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले.
अहेरी : येथील उपजिल्हा रूग्णालयात सकाळी १० वाजता जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. लाल फित कापून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वत: गोळ्या खाऊन या मोहिमेची सुरूवात केली. दरम्यान उपजिल्हा रूग्णालयातील अनेक रूग्णांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. अनंत जाधव, डॉ. विशाल येर्रावार, सुधाकर तिम्मा, शिवराम पुल्लुरी, प्रशांत गोडसेलवार, राकेश सडमेक तसेच उपजिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
तुळशी : राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी डीईसी, अलबेंडाझॉल आयवरमेक्विन गोळ्या सेवनाची सामुदायिक औषध उपचार मोहीम राबविण्यास सोमवारपासून सुरूवात करण्यात आली. या मोहिमेंतर्गत येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना गोळ्या वाटप करण्यात आल्या. गोळ्या वाटप करताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या उंचीचे मोजमाप करुन त्यानुसार ठरलेल्या प्रमाणात गोळ्या वाटप करण्यात आल्या. यावेळी तुळशी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रियंका नाकाडे, आरोग्य सेविका एस.एम.मेश्राम, व्ही.एस.भोयर, आरोग्यसेवक ललीत बडोले, मदतनीस विश्रांती लोणारे, आशावर्कर हिरकन्या रामटेके, शीला लोणारे व सचिन रामटेके उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिक्षक के.आर. गजापुरे, एन.जी. शेंडे, संदीप शेंडे यांनी सहकार्य केले. शाळेत मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर गावात आशावर्कर व आरोग्य कर्मचाºयांनी घरोघरी भेट देऊन गोळ्यांचे वितरण केले.
ही आहेत हत्तीरोगाची लक्षणे
मायक्रोफालेरिया संसर्गीत डासांमुळे हत्तीरोगाचे संक्रमण होते. सुरवातीच्या काळामध्ये अंगदुखी, ताप अशी साधारण लक्षणे दिसून येतात. तथापी कालांतराने लसिका वाहिन्या व ग्रंथीमध्ये अडथळा निर्माण होऊन हत्तीरोग व अंडवृध्दी होते. हा एक दीर्घ मुदतीचा मानसिक व शारीरिक क्लेश देणारा आजार आहे. आजार पूर्णत: बरा होण्यासाठी दीर्घकाळ गोळ्यांचे सेवन करावे लागते. परंतु प्रतिबंधात्मक औषधी घेतल्याने हत्तीरोगास प्रतिबंध घालता येतो. वर्षातून एकदाच राबविल्या जाणाऱ्या हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत वितरित केल्या जाणाºया गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.