दारूविक्रीविरोधात मोहीम तीव्र
By Admin | Updated: July 6, 2015 01:58 IST2015-07-06T01:58:20+5:302015-07-06T01:58:20+5:30
पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात विशेष मोहीम चालविली आहे. गडचिरोली तालुक्यातील चांदाळा येथे रविवारी १ लाख ३२ हजार..

दारूविक्रीविरोधात मोहीम तीव्र
गडचिरोली/ चामोर्शी : पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात विशेष मोहीम चालविली आहे. गडचिरोली तालुक्यातील चांदाळा येथे रविवारी १ लाख ३२ हजार तर चामोर्शी येथे मागील तीन दिवसांच्या कारवाईत २० आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ३४ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये तीन दुचाकींचाही समावेश आहे.
गडचिरोली तालुक्यातील चांदाळा टोली येथे शीला शामराव किरंगे यांच्या घरून पोलिसांनी १ लाख ३२ हजार रूपयांचा दारूसाठा रविवारी सायंकाळी ७ वाजता जप्त केला. जप्त केलेल्या साठ्यात ४२२ निपाच्या ९ पेट्या व २५ लिटर मोहफुलाच्या दारूचा समावेश आहे. पोलिसांना मिळालेच्या माहितीनुसार केलेल्या कारवाईत आरोपी पिंटू मंडल, अनादी मंडल घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी दारूसाठा ताब्यात घेतला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय जयंत मुनगेलवार, पोलीस हवालदार हिरामण गायकवाड, सोनुले, भोयर, सचिन गोपनारायण, अश्विनी शेंडे, चंडीकार, विलास घोडाम यांनी केली.
चामोर्शी तालुक्यात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास देवाजी रामा जावध (२८), महेंद्र केसरी कुकेटी दोघेरी रा. राजूर (बु.), सोमाजी शामराव कुकेटी (३५), सुधाकर शामराव कुकेटी (३७), देवाजी कुकेटी (२९) रा. कोरसेगट्टा यांच्या घराची झळती घेतली असता, त्यांच्या घरातून २४ हजार रूपये किमतीची मोहफुलाची दारू व सडवा आढळून आला. शुक्रवारी रामकृष्णपूर येथील निमाई पाचू माल (५८) याच्या घरी ४० लिटर, असित अमुल्य सुवर्णकार (४०) याच्या घरी ३० लिटर, पुष्पा रवींद्र किर्तमिया (५५) यांच्या शेतशिवारातील झोपडीत ८० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. विष्णुपूर येथील लव हलदार याच्या शेतशिवारात ५ लिटर मोहफुलाची दारू, आनंद सतीश सरकार, रवींद्र मोतिलाल सरकार याच्या शेतशिवारातील झोपडीत १० लिटर दारू व १५० लिटर सडवा आढळून आला. शनिवारी चामोर्शी येथील रमेश शामराव सदुलवार याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरातून ८० निपा दारू, लालडोंगरी येथील अनिता आनंदराव सरकार हिच्या घरी ३५ लिटर मोहफुलाची दारू आढळून आली.
पोलिसांनी यशवंत कोगीलवार, शंकर सोनटक्के यांच्याकडून मोहफुलाची दारू व दुचाकी जप्त केली आहे. त्याचबरोबर क्रिष्णा दत्त, अमर रॉय, जीवनदास कोगीलवार, बोनू कोगीलवार याच्याकडूनही दारू जप्त केली आहे. सदर कारवाई ठाणेदार किरण अवचर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार हरिश्चंद्र कन्नाके, दुलाल मंडल, अशोक कुमरे, हवालदार रेमाजी धुर्वे, आनंद टेकाम, शिपाई नीतील पाल, घोट येथील सहाय्यक फौजदार देविदास मानकर, यादव मेश्राम यांनी केली. (शहर प्रतिनिधी)