अवैध दारूविक्रेत्यांविरूद्ध मोहीम
By Admin | Updated: July 6, 2015 01:56 IST2015-07-06T01:16:26+5:302015-07-06T01:56:40+5:30
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांविरोधात शनिवारी (दि.४) मोहीम छेडली.

अवैध दारूविक्रेत्यांविरूद्ध मोहीम
गोंदिया : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांविरोधात शनिवारी (दि.४) मोहीम छेडली. मोहिमेंतर्गत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली असून दारू विक्रेत्यांना अटक केली आहे.
यामध्ये, अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत इसापूर येथील कलमबाई सहदेव सहारे (४०) हिच्याकडून २० लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. तिरोडा तालुक्याच्या करडी बुज येथील प्रमिला मनोज मराठे (४०) हिच्याकडून १५ लीटर, कपील भाऊदास साळुंके (४०, रा.गौतमबुध्द वॉर्ड, तिरोडा) याच्याकडून १० लीटर, कोडेलोहारा येथील देवराम टेंभेकर (३७) कडून २० लीटर, गुलाबटोला येथील प्रमीला प्रकाश खोब्रागडे (३०) कडून ३० लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. रावणवाडी पोलीसांनी बिरसोला येथील चंदन सुखचरण कागदीउके (४०) कडून १० लीटर, धीरज सुखचरण कागदीउके (२१) कडून १३ लीटर, भुजमल हरिफ ठवरे (३७) कडून ९ लीटर हातभट्टीची दारू जप्त केली. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जांभळी येथील रामदास सिताराम नंदेश्वर (६५) कडून १३ लीटर हातभट्टीची दारू व प्रधान मोहल्यातील सुरेश मोहनदास कोडापे (२५) कडून देशी दारूचे ५ पव्वे जप्त केले.
शहर पोलीस ठाण्यांतर्गत चुटीया येथील कैलाश मंगल इनवाते (३५) कडून १० लीटर हातभट्टीची दारू, शहरातील छोटा गोंदिया येथील बुध्दराज गुजोबा वैद्य (७३) कडून देशी दारूचे २५० पव्वे जप्त करण्यात आले. गोरेगाव पोलिसांनी तिमेझरी येथील रमेश भुरू बुरेले (४६) कडऊन देशी दारूचे १० पव्वे, तिल्ली मोहगाव येथील तोताराम हरिचंद शहारे (४६) कडून ६ पव्वे, दवडीपार येथील देवांगणा देवराम राऊत (४५) कडून ५ पव्वे, कवलेवाडा येथील यादेराव माळेसर (२८) कडून १० लीटर हातभट्टीची दारू, सोनेगाव येथील धनराज झोला उईके (३८) कडून ५ लीटर, मुंडीपार येथील प्रकाश धनलाल राऊत (२६) कडून १० लीटर, हनुमानटोला येथील हिवराम रामलाल केवले (२५) कडून ५ लीटर, सहेसपूर येथील उमला चंभारू कोल्हारे (५०) या महिलेकडून ५ लीटर हातभट्टीची दारू जप्त केली.
तसेच, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गार्डनपूर येथील श्रीराम तिरकू वट्टी (५५) कडून देशी दारूचे १७ पव्व, लोहारा येथील सरीता दिलीप डोंगरे (४०) कडून ५ लीटर हातभट्टीची दारू, महागाव येथील पवन दिगंबर नागपुरे (१९) कडून १० लीटर, परसवाडा येथील किरणबाई राजेश शहारे (४०) कडून १० लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत बाजारवाडी येथील मोहन कुंजीलाल पशीने (५८) कडून देशी दारूचे ९ पव्वे, पिपरटोला येथील सुनिल रामचंद्र धुर्वे (२०) कडून २० पव्वे, चांदणीटोला येथील बाबुलाल उमेदलाल बघेले (३६) कडून ४८ पव्वे, चुलोद येथील अनमोल पुरूषोत्तम नागदेवे (२८) कडून १० लीटर हातभट्टीची दारू, हलबीटोला (खमारी) येथील वामन सातन तुरकर (५६) कडून देशी दारूचे १० पव्वे तर चांदणीटोला येथील झनकलाल रूपचंद मस्करे (४५) कडून देशी दारूचे ४८ पव्वे जप्त करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)