सी-६० पोलीस पथकाचा कमांडर अपघातात जखमी

By Admin | Updated: November 17, 2016 02:03 IST2016-11-17T02:03:49+5:302016-11-17T02:03:49+5:30

एका चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून जात असलेले गडचिरोली येथील सी-६० पोलीस पथकाचे

C-60 police squad commander injured in accident | सी-६० पोलीस पथकाचा कमांडर अपघातात जखमी

सी-६० पोलीस पथकाचा कमांडर अपघातात जखमी

कुरखेडा : एका चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून जात असलेले गडचिरोली येथील सी-६० पोलीस पथकाचे कमांडर गंभीररित्या जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता पुराडा-कोरची मार्गावर पुराडापासून दीड किमी अंतरावर घडली. अपघातात जखमी झालेल्या पोलीस कमांडरचे नाव किशोर कोल्हे (४२) असे आहे.
पोलीस कमांडर किशोर कोल्हे हे आपल्या दुचाकी वाहनाने काही कामानिमित्त कोरचीकडे जात असताना पुराडाजवळ काही अंतरावर विरूध्द दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक सीजी ०८ यू ७०७१ या वाहनाशी खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात समोरासमोर धडक झाली. या अपघातात कोल्हे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पुराडाचे पोलीस उपनिरिक्षक पंकज महाजन यांनी घटनास्थळावर पोहोचत अपघातग्रस्त चारचाकी वाहनात जखमी कोल्हे यांना बसवून कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना ब्रह्मपुरी येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. चारचाकी वाहन मो. जमील शेख रा. नागपूर हे चालवित होते, अशी माहिती मिळाली आहे.

Web Title: C-60 police squad commander injured in accident