पं.स.च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची सरशी

By Admin | Updated: April 19, 2016 05:32 IST2016-04-19T05:32:18+5:302016-04-19T05:32:18+5:30

गडचिरोली तालुक्यातील जेप्रा व धानोरा तालुक्यातील धानोरा या पंचायत समिती गणाच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने

In the bye election of the Congress, | पं.स.च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची सरशी

पं.स.च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची सरशी

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील जेप्रा व धानोरा तालुक्यातील धानोरा या पंचायत समिती गणाच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळविले असून जेप्रा पं.स. गणातून काँग्रेसच्या अमिता शामकांत मडावी २८० मतांनी विजयी झाल्या आहे. तर धानोरा पं.स. गणातून काँग्रेसच्या ममिता अवसूजी किरंगे १२१ मतांनी विजयी झाल्या आहे. धानोराची जागा काँग्रेसने आपल्या कब्ज्यात राखण्यात यश मिळविले तर जेप्राची जागा मात्र त्यांनी अपक्षांकडून खेचून आणली आहे.
गडचिरोली तालुक्यातील जेप्रा पंचायत समिती गणात काँग्रेसच्या अमिता शामकांत मडावी यांना १ हजार २५८, भाजपच्या नंदा दत्तात्रय सलामे यांना ९७८, शिवसेनेच्या पुस्तकला अरूण सिडाम यांना ५९३ मते मिळाली. तर ६७ मतदारांनी नोटाचा वापर केला. एकूण २ हजार ८९६ मते वैध ठरली. काँग्रेसच्या अमिता मडावी यांनी भाजपच्या सलामे यांचा २८० मतांनी पराभव करून ही जागा काँग्रेसच्या पदरात पाडली.
धानोरा पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या ममिता अवसूजी किरंगे या १२१ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या सुशिला सुखदेव टेकाम यांचा पराभव केला. ममिता किरंगे यांना १ हजार ३८ तर सुशिला टेकाम यांना ९१७ तर शिवसेनेच्या कल्पना होळी यांना १८८ मते मिळाली. ८१ मतदारांनी नोटाचा वापर केला. या दोन्ही विजयानंतर काँग्रेसने मोठा जल्लोष साजरा केला.
गडचिरोली येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दयाराम भोयर यांनी काम पाहिले. धानोरा येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार तथा सहायक निवडणूक अधिकारी शशिकांत चन्नावार, नायब तहसीलदार सुधाकर मडावी यांनी काम पाहिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

जेप्रा पंचायत समिती गण
मतदान केंद्रअमिता मडावीनंदा सलामेपुस्तकला सिडामनोटा
जेप्रा१६४११९९२९
राजगाटा माल१५२६२९१९
खुर्सा३२६१७९४८११
बामणी७६२३१६८११
बामणी३७५३२७१
सावरगाव१४८५२२३०११
बोदली माल२१७१९९२७११
बोदली तु.१३८८३१०४
एकूण १,२५८९७८५९३६७

धानोरा पंचायत समिती गण
मतदान केंद्रममिता किरंगेसुशिला टेकामकल्पना होळीनोटा
सोडे२९९१५११४
हेटी२६२१२९२३१५
सालेभट्टी२५७३४१७४३१
सालेभट्टी४०६७२६७
येरकड१८०३६५५४२४
एकूण १,०३८९१७१८८८१

Web Title: In the bye election of the Congress,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.