नक्षल बंदमुळे बसफेऱ्या प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:04 IST2019-07-29T00:00:10+5:302019-07-29T00:04:43+5:30
२८ जुलैपासून नक्षल बंदला सुरूवात झाली आहे. नक्षल बंददरम्यान घातपाताच्या घटना घडण्याची शक्यता राहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुर्गम भागात जाणाºया जवळपास १६ बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत.

नक्षल बंदमुळे बसफेऱ्या प्रभावित
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २८ जुलैपासून नक्षल बंदला सुरूवात झाली आहे. नक्षल बंददरम्यान घातपाताच्या घटना घडण्याची शक्यता राहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुर्गम भागात जाणाºया जवळपास १६ बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. दरवर्षीच्या तुलनेत रद्द असलेल्या बसफेऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
२८ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान नक्षलवाद्यांनी बंदचे आवाहन केले आहे. बंद यशस्वी करण्यासाठी नक्षल्यांकडून घातपाताच्या घटना घडवून आणून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगारांनी दुर्गम व नक्षल प्रभावित भागात जाणाºया बसफेºया बंद ठेवल्या आहेत. गडचिरोली आगारातून जाणाºया कोटगूल, मानापूर, गोडलवाही, विकासपल्ली, गिलगाव, मालेवाडा, खांबाळा आदी बसफेºया अंशत: तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत. यातील काही बसफेºया शांत भागात असलेल्या गावापर्यंत जाऊन परत आणण्यात आल्या आहेत.
अहेरी आगारातून सुटणाºया कसनसूर, जारावंडी, लाहेरी, गट्टा या बसफेºया रद्द झाल्या आहेत. या बसफेºया तालुकास्थळापर्यंत पाठविण्यात आल्या आहेत.
बसफेºयांसोबतच खासगी वाहतूक सेवाही बंद ठेवण्यात आली होती. धानोरा येथील वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होती. दुर्गम भागातील रोवणे सुध्दा बंद ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे नक्षल बंदच्या पहिल्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
नक्षल बंदचा प्रभाव ओसरला
नक्षल बंद दरम्यान घातपाताच्या घटना नक्षल्यांकडून घडविल्या जात असल्याने नागरिक स्वत:हून बंद पाळत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव होता. मात्र यावर्षी नक्षल बंदचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. नक्षल प्रभावित काही गावांमध्ये बंद पाळण्यात आला. तर काही गावातील तरूणांनी नक्षलवाद्यांचे बॅनर जाळून नक्षलवादी व बंदचा निषेध केला. तालुकास्तरावर तर बंदचा अजिबाद प्रभाव दिसून आला नाही.