आरमोरीत राणे यांच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:41 IST2021-08-25T04:41:43+5:302021-08-25T04:41:43+5:30
आरमोरी येथे युवासेना व शिवसेनेच्या वतीने शिवसैनिक आणि युवासैनिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राणे मुर्दाबादसह त्यांच्याविरुद्ध विविध ...

आरमोरीत राणे यांच्या पुतळ्याचे दहन
आरमोरी येथे युवासेना व शिवसेनेच्या वतीने शिवसैनिक आणि युवासैनिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राणे मुर्दाबादसह त्यांच्याविरुद्ध विविध नारे लावण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यासह युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, माजी सभापती शेखर मने, महिला संघटिका हेमलता वाघाडे, माजी जि.प. सदस्य वेणू ढवगाये, न.प.चे बांधकाम सभापती सागर मने, भूषण सातव, नगरसेवक माणिक भोयर, कवडू सहारे, लहानू पिलारे, पुंजीराम मेश्राम, राजू ढोरे, मधुसूदन चौधरी, देवराव शेडमाके, विजय मुर्वतकर, सरपंच रमेश कुथें, सरपंच प्रशांत किलनाके, माजी नगराध्यक्ष महेंद्र मोहबन्सी, सरपंच विजय दडमल, माजी सभापती पुंडलिक देशमुख यांच्यासह अनेक महिला, शिवसैनिक व युवा सैनिक हजर होते.
240821\img-20210824-wa0051.jpg
आरमोरी येथे संताप व्यक्त करताना शिवसेना व युवासेनेचे पध्दधिकारी......