शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे आढळले जास्त

By admin | Updated: September 4, 2016 01:49 IST

स्थानिक पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी उद्धव डांगे यांनी शनिवारला शहरातील इंग्रजी माध्यमांच्या काही कॉन्व्हेंटमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन तपासले.

शाळांवर कारवाईचे संकेत : गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने केली तपासणीगडचिरोली : स्थानिक पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी उद्धव डांगे यांनी शनिवारला शहरातील इंग्रजी माध्यमांच्या काही कॉन्व्हेंटमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन तपासले. या तपासणीत इयत्ता पहिली व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे सर्वात जास्त आढळून आले. दप्तरांचे ओझे जास्त आढळून आलेल्या संबंधित कॉन्व्हेंट व शाळांवर शासकीय नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे संकेत गट शिक्षणाधिकारी उद्धव डांगे यांनी दिले आहे.शासकीय नियमानुसार इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन १ हजार ८०० ग्रॅम, इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्याच्या दप्तराचे वजन १ हजार ७८५ ग्रॅम, इयत्ता तिसरीचे २ हजार ४०० ग्रॅम, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरांचे वजन २ हजार ६८५ ग्रॅम, इयत्ता पाचवीसाठी ३ हजार १२५ ग्रॅम, इयत्ता सहावीसाठी ३ हजार १४१ ग्रॅम, सातवीला ३ हजार ३५७ ग्रॅम व इयत्ता आठवीला ३ हजार ४२५ ग्रॅम वजनाच्या दप्तराची अनुमती आहे. मात्र स्कूल आॅफ स्कॉलर शाळेत शनिवारी गट शिक्षणाधिकारी उद्धव डांगे व त्यांच्या पथकाने विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या वजनाची नोंद घेतली असता, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याच्या दप्तराचे वजन साडेचार किलो ग्रॅम व आठवीतील विद्यार्थ्याच्या दप्तराचे वजन साडेसात किलोग्रॅम आढळून आले, अशी माहिती डांगे यांनी दिली. तपासणी पथकात निखील कुमरे, अजितसिंग टांक, डॉ. छाया वाघधरे, मनिषा मुरकुटे, भुवनेश्वरी वाढई, वैशाली धार्मिक सहभागी होते. (प्रतिनिधी)दप्तरांचे ओझे मर्यादित ठेवाअधिक वजनाचे दप्तर वाहून नेताना संबंधित विद्यार्थ्याच्या आरोग्यावर दुष्पपरिणाम होतात. बालवयात अस्थिव्यंगाचा धोका असतो. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे मर्यादित ठेवावे, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी डांगे यांनी केले आहे. यानंतर विविध शाळांमध्ये तपासणी होणार आहे.