सात गावांचा भार कंत्राटी आरोग्यसेविकेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST2021-04-19T04:33:36+5:302021-04-19T04:33:36+5:30
मुलचेरा : तालुक्यातील कोपरअली येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन वर्षांपासून कंत्राटी आरोग्यसेविकेच्या भरवशावर सुरू असून येथे स्थायी आरोग्यसेविकाचे पद ...

सात गावांचा भार कंत्राटी आरोग्यसेविकेवर
मुलचेरा : तालुक्यातील कोपरअली येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन वर्षांपासून कंत्राटी आरोग्यसेविकेच्या भरवशावर सुरू असून येथे स्थायी आरोग्यसेविकाचे पद भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र झाडे यांनी केली आहे.
तालुक्यातील सुंदरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कोपरअली येथील आरोग्य उपकेंद्रात कोपरअल्ली(चेक), कोपरअल्ली(माल),अंबेला, लभानतांडा, विश्वनाथनगर, रेंगेवाही, लोहारा ही सात गावे येतात. प्रत्येक आरोग्य उपकेंद्रात स्थायी आरोग्यसेविका व कंत्राटी आरोग्यसेविका असते. मात्र, कोपरअल्ली येथील आरोग्यसेविकेचे पद ३ वर्षांपासून रिक्त आहे. प्रशासनाला याबाबत अनेकदा निवदने दिली. मात्र, आराेग्यसेविकेचे पद भरण्यात आले नाही. एकट्या कंत्राटी आरोग्यसेविकेवर सात गावांचा भार असून लसीकरण, कार्यालयीन मिटींग, रुग्ण, प्रसूती असे विविध कामे एकट्या आरोग्यसेविकेला पार पाडावी लागत असल्यामुळे आरोग्यसेवेचा लाभ प्रत्येक रुग्णांना मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने कोपरअली येथील आरोग्य उपकेंद्रात स्थायी आरोग्यसेविकेचे रिक्त पद तत्काळ भरावे, अशी मागणी रवींद्र झाडे यांनी केली आहे.